मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या तातडीच्या सुटकेच्या विनंती अर्जावर मुंबई हायकोर्ट सोमवारी दुपारी ३ वाजता निर्णय सुनावणार आहे. त्यामुळं अर्णब यांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय आता उद्या होणार आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बुधवारी (४ नोव्हेंबर) पहाटेपासून अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना खूप प्रयत्न करूनही शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीच्या सुटकेचा दिलासा मिळू शकला नाही. त्यामुळे तूर्त त्यांना न्यायालयीन कोठडीअंतर्गत अलिबागच्या तुरुंगातच रहावे लागणार आहे. या प्रकरणावर सोमवारी ३ वाजता निर्णय सुनावणार आहे. हायकोर्टानं रात्री उशीरा जारी केलेल्या नोटीसनुसार न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचे खंडपीठ सोमवारीच विशेष व्हीसी सुनावणीत निकाल सुनावणार आहेत. दरम्यान, शनिवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने आरोपींना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. ता तातडीने कोणताही आदेश देऊ शकत नाही. आम्ही आदेश राखून ठेवत आहोत. सर्वांचे युक्तिवाद लक्षात घेऊन योग्य तो आदेश देऊ. आदेश लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न करू. मात्र, दिवाळीची सुटी असल्याने यादरम्यान तो जाहीर करण्याविषयी आम्हाला प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींचीही परवानगी घ्यावी लागेल. मात्र, आरोपींना जामिनासाठी नियमित अर्ज करून योग्य ते कायदेशीर मार्ग अवलंबण्याची मुभा असेल', असे खंडपीठाने स्पष्ट केले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2IcCmQO
No comments:
Post a Comment