Breaking

Saturday, November 14, 2020

उन्नावमध्ये पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू, दोन पोलीस निलंबित https://ift.tt/3krNlTK

उन्नाव, : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये पत्रकार यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दोन आरोपी पोलिसांना निलंबीत करण्यात आलंय. वरीष्ठ पोलीस अधीक्षक विनोद कुमार पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी रेल्वे रुळाजवळ २२ वर्षीय पत्रकार सूरज पांडेय यांचा मृतदेह आढळून आला होता. सूरज यांची आई लक्ष्मी पांडेय यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर बिहार पोलिसांत तैनात सुनिता चौरसिया आणि महिला स्टेशनमध्ये स्टेशनअध्यक्षाचा वाहन चालक शिपाई अमर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याची पोलिसांत नोंद झाल्यानंतर हे दोन्हीही पोलीस कर्मचारी आपापल्या स्थळावरून फरार झाले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी दोघांनाही निलंबित केलंय. हे दोघे का फरार झाले होते? याविषयीची चौकशी मात्र अद्याप सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांकडून पोलीस क्षेत्राधिकारी गौरव त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली एक टीम गठीत केलीय. वाचा : वाचा : पत्रकाराच्या संशयास्पद मृत्यूनंतर दोन दिवसांनी मृत पत्रकाराच्या आईनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कुटुंबाची सुरक्षा आणि दोषींविरुद्ध कारवाईसाठी पत्र लिहिलं होतं. पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी प्राथमिकदृष्ट्या दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टेमध्ये शरीरावर आढळलेल्या जखमा रेल्वे दुर्घटनेमुळे झाल्याचं दिसतंय. तसंच समोर आलेल्या माहितीनुसार, हे आत्महत्येचं प्रकरण दिसत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2IE3WGQ

No comments:

Post a Comment