Breaking

Tuesday, November 3, 2020

अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण? मतदारांसाठी ठरले 'हे' महत्त्वाचे मुद्दे https://ift.tt/3kV9ESJ

वॉशिंग्टन: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडल्यानंतर मतदानानंतरचे सर्वेक्षण समोर आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी आर्थिक प्रश्न आणि वर्णद्वेषाला अधिक महत्त्व दिले असल्याचे समोर आले आहे. तर फक्त एक तृतीयांश मतदारांनी कोविड-१९ चा प्रश्न प्रमुख मुद्दा असल्याचे त्यांनी साांगितले. सीएनएनने केलेल्या सर्वेक्षणात ३४ टक्के मतदारांनी अर्थव्यवस्थेचा मुद्दा प्रमुख असल्याचे सांगितले. २१ टक्के जणांनी वर्णद्वेष आणि असमानतेचा मुद्दा प्रमुख असल्याचे म्हटले. तर, करोनाचा मुद्दा फक्त १८ जणांना महत्त्वाचा वाटला. वाचा: करोनाचा संसर्गाचे सर्वाधिक बाधित अमेरिकेत आहेत. करोनाचा तीव्र परिणाम अमेरिकेवर झाला आहे. अशा स्थितीत फक्त १८ टक्के जणांनी त्याला अधिक महत्त्व दिले आहे. अमेरिकेतील ११ टक्के मतदारांनी गुन्हेगारी, सुरक्षा तसेच आरोग्य सेवा धोरण हे मुख्य विषय असल्याचेही नमूद केले. ११५ ठिकाणी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ७७७४ मतदारांशी चर्चा करण्यात आली. त्याशिवाय ४९१९ मतदारांशी फोनवरून चर्चा करण्यात आली. वाचा: दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाबद्दल खात्री व्यक्त केली. फ्लोरिडा, टेक्सास, ओरिजोनामध्ये चांगली कामगिरी करणार असून लोकांचा मोठा प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटीक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांच्यावरही टीका केली. बायडन यांच्यानंतर हॅरीस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिका आणि महिलांसाठी अतिशय काळजी करणारी गोष्ट असणार आहे. सिनेटर बर्नी सँडर्स यांच्या तुलनेने हॅरीस अधिक डाव्या विचारांच्या असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38aukm7

No comments:

Post a Comment