
अहमदनगर: 'रोहितजी तुम्ही महाराष्ट्राचे भावी नेतृत्व आहात. पुढील खूप वर्ष भाजप सत्तेत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला जॉईन करणे आवश्यक आहे,' असा सल्लाच राष्ट्रवादीचे आमदार यांना एका सोशल मीडिया युजर्सने दिला. मात्र त्यावर रोहित पवार यांनी, 'माझी शैली आवडत असेल तर आपणच एकत्र काम करू यात ना,' असे म्हणत चांगलीच फिरकी या युजर्सची घेतली. तसेच त्यांनी युजर्सला उत्तर देताना अप्रत्यक्षपणे भाजपवरही निशाणा साधला. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मतदारसंघात करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या, विविध उपक्रमांच्या माहितीसह राज्य व देशातील राजकारणावर देखील ते अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करताना दिसतात. त्यावर अनेक जण आपली मते व्यक्त करतात. मात्र रोहित पवार यांच्या एका ट्विटनंतर त्यांना थेट एनडीएमध्ये प्रवेश करण्याचा सल्लाच एका सोशल मीडिया युजर्सने दिला. त्यावरून पवार यांनी या युजर्सची फिरकी घेतानाच लोकशाहीत कोणताही पक्ष कायम सत्तेत नसतो, असा टोलाही भाजपला लगावला आहे. वाचा: पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात आली. त्यानंतर मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांमध्ये जात रोहित पवार यांनी दर्शन घेतले होते. त्याबाबत त्यांनी पाडव्याला ट्विटरवर ही माहिती दिली होती. त्यामध्ये पवार यांनी म्हटलं होतं, 'राज्यात धार्मिक स्थळं उघडण्यासाठी माझ्यासह इतरांनीही केलेल्या विनंतीनुसार आजपासून ती सुरू झाली आहेत. यानिमित्त माझ्या मतदारसंघात पहाटे खर्ड्यात संत सिताराम बाबा व संत गितेबाबा यांच्या समाधीची पूजा करून दर्शन घेतलं. तसंच जामखेडमधील नागेश्वर मंदिर आणि दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं.' रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया युजर्सने त्यांना एनडीएमध्ये जाण्याचा सल्ला दिला. 'रोहितजी तुम्ही महाराष्ट्राचे भावी नेतृत्व आहात. भाजप पुढील अनेक वर्षे सत्तेत राहील, त्यामुळे तुम्हाला एनडीए जॉईन करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीत तुम्हाला मुख्यमंत्री किंवा दुसर्या कोणत्याही नेतृत्वाची संधी मिळणार नाही,' अशा आशयाची प्रतिक्रिया या युजर्सने दिली होती. त्यावरून मात्र पवार यांनी या युजर्सची फिरकी घेताना भाजपवरही निशाणा साधला आहे. वाचा: 'राजकारणात कुणाला कोणत्या पदावर बसवायचं हे जनता ठरवत असते. मी कुठल्या पदासाठी काम करत नाही, तसं असतं तर कदाचित आजवर पदही घेतलं असतं. एनडीएत प्रवेश करायचं म्हणाल, तर आपल्या मताचा आदर आहे, पण लोकशाहीत कोणताही पक्ष कायम सत्तेत नसतो, माझी शैली आवडत असेल तर आपणच एकत्र काम करुयात ना.!' असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pDlkMF
No comments:
Post a Comment