सातारा: '' या मालिकेतील '' व्यक्तिरेखेमुळं घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री यांचं शनिवारी सायंकाळी निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. कर्करोगानं त्रस्त असलेल्या कमल ठोके यांच्यावर बेंगळुरू इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. कमल ठोके या मूळच्या शिक्षक. तब्बल ३३ वर्षे त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली. २००५ साली मुख्याध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांनी मिळवला होता. शिक्षकी पेशा सांभाळत त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली. राज्य नाट्य स्पर्धांमध्येही त्यांनी भाग घेतला होता. १९९२ साली त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. मात्र, शिक्षकाची नोकरी सांभाळून अभिनयाची आवड जोपासण्यास मर्यादा होत्या. सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांनी अभिनयावर लक्ष केंद्रित केले. छोट्या पडद्यावर येण्याआधी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. बाबा लगीन, बरड, माहेरचा आहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, आम्ही असू लाडके, नामदार मुख्यमंत्री गावडे, सासर माहेर, कुंकू झालं वैरी, भरला मळवट अशा अनेक चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या त्या 'देवमाणूस' मालिकेत काम करत होत्या. कमल ठोके यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर येथील त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आणखी वाचा: वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38LcypR
No comments:
Post a Comment