Breaking

Thursday, November 12, 2020

Twitter भारतात होऊ शकते ब्लॉक; शनिवारपर्यंत द्यावे लागणार उत्तर https://ift.tt/3nwXb91

नवी दिल्ली: प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी ट्विटरला (Twitter) भारतात निलंबित किंवा ब्लॉक केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लेहला (Leh) लडाख केंद्रशासित प्रदेशात दाखवण्याऐवजी तो जम्मू आणि काश्मीरचाच भाग दाखवल्याबद्दल केंद्र सरकारने ट्विटरला कायदेशीर कारवाईचा ईशारा दिला आहे. इंडियाच्या (Twitter India) विरोधात कारवाई होऊ शकते, असे एका उच्चाधिकाऱ्याने म्हटले आहे. सरकार याकडे भारताच्या सार्वभौम संसदेच्या इच्छाशक्तीचा अपमान करण्यासाठी ट्विटरकडून जाणूनबूजून प्रयत्न केला गेला या दृष्टीने पाहत आहे. संसदेने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले होते. लेहमध्ये या प्रदेशाचे मुख्यालय आहे. ( from in ) ट्विटरवर कायदेशीर कारवाई का करू नये, सरकारने विचारले सरकारने सोमवारी ट्विटरला एक नोटीस धाडत ५ दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे. या पूर्वी जेव्हा हा चीनचा भाग दाखवला गेला, त्यावेळी ट्विटरचे संस्थापक जॅक डार्सी यांना नोटीस पाठवण्यात आली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी ट्विटरच्या ग्लोबल उपाध्यक्षाला नोटीस पाठवली होती. त्यात चुकीचे मानचित्र दाखवून भारताच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचा अपमान केल्याप्रकरणी ट्विटर आणि कंपनीच्या प्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई का करू नये, असे या नोटीशीत विचारले होते. ट्विटरने ऐकले नाही तर काय होईल? एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जर ट्विटरने या नोटीशीला उत्तर दिले नाही, तर सरकार कायदेशीर कारवाई करेल. भारताच्या मानचित्राशी छेडछाड केल्याप्रकरणी आम्ही भारताच्या प्रमुखाविरोधात फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम, १९६१ अंतर्गत एफआयआर दाखल करू शकतो असे सूत्राने सांगितले. या अंतर्गत सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. या व्यतिरिक्त सरकार आयटी कायद्यांतर्गत देखील कारवाई करू शकते. या कायद्याच्या कलम ६९अ नुसार कंपनीला ब्लॉक देखील केले जाऊ शकते. भारताच्या प्रादेशिक अखंडतेवर प्रश्न उपस्थित करणे किंवा भारताच्या प्रादेशिक अखंडतेला धक्का लागू शकतो अशा प्रकारचा कंटेंट दाखवला गेला तर अशी वेबसाइट ब्लॉक केली जाऊ शकते, असे सूत्राने सांगितले. क्लिक करा आणि वाचा- जर ट्विटरने शनिवारी संध्याकाळपर्यंत उत्तर दिले नाही, तर ट्विटर विरोधात गंभीर कारवाई होण्याची शक्यता आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32ET56p

No comments:

Post a Comment