मुंबई : मुंबईचे यांनी सांगितलेली कामे करण्यास महापालिका यांनी नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार खटके उडाल्याची चर्चा आहे. शेख हे आपल्यावर वारंवार राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार चहल यांनी काँग्रेस नेते यांच्याकडे केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अस्लम शेख यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केल्याने त्यांना पालिकेची खडानखडा माहिती आहे. विकासकामांच्या निविदा प्रक्रिया, कामे करताना येणारे प्रशासकीय अडथळे, कंत्राटदारांचा आडमुठेपणा याची चांगली जाण असलेल्या शेख यांनी मागील काही महिन्यांपासून पालिका आयुक्तांकडे काही कामांबाबत आग्रह धरला आहे. तसेच काही कंत्राटदारांच्या कामांबाबत आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. त्यावर आयुक्त पावले उचलत नसल्याने शेख हे आयुक्तांच्या कामांबाबत नाराज आहेत, असे सांगितले जाते आहे. सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम अहलुवालिया कॉन्टॅक्ट इंडिया या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. सुमारे ५५० कोटींचे हे काम आणखी कमी दरात करण्यासाठी इतर कंत्राटदार तयार असताना अहलुवालियासाठी निविदा अटींमध्ये शिथिलता आणल्याचा आरोप शेख यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. वरळी, मालाड, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडुप आणि वर्सोवा या ठिकाणी पालिका सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या कंत्राटात कंत्राटदाराने नागरी सुविधा नियमावलीचे (सीव्हीसी) उल्लंघन केल्यानंतरही कंत्राटदाराला पालिका पाठीशी घालत असल्याचा दावा शेख यांनी केला आहे. तसेच हा प्रकल्प दोन हजार कोटींत करणे शक्य असताना प्रशासन अव्वाच्या सव्वा दरात हा प्रकल्प उभारत असल्याचा दावा शेख यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. यासह अन्य काही विकासकामे आणि कंत्राटांबाबत शेख यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्याची उत्तरे आयुक्तांकडून मिळत नसल्याने शेख यांनी शुक्रवारी आयुक्तांना आपल्या बेलहेवन-१ या बंगल्यावर बोलावून घेतले होते. तेथे शेख यांनी या कामांबाबत आयुक्तांकडे विचारणा केली असता आयुक्तांनी प्रशासकीय नियमावलीचे पालन करीत देण्यात आलेली ही कंत्राटे आहेत. त्यात आपण काहीही करू शकत नाही, असे स्पष्ट करत शेख यांचा राजकीय दबाव झुगारला, अशी माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. आयुक्त ऐकत नसल्याने शेख यांचा पारा चढला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद आणखी वाढत असल्याने आयुक्त रागाने बंगल्यातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट राहुल गांधी यांच्या पीएला फोन करून शेख यांची तक्रार केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाद झाला नाही : अस्लम शेख याबाबत अस्लम शेख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी विकासकामांबाबत आपण आयुक्तांना पत्र पाठवत असल्याचे तसेच त्यांच्याशी दूरध्वनीवरून नेहमीच संवाद होत असल्याचे सांगितले. आयुक्तांचा आणि आपला कोणताही वाद झाला नाही. आयुक्त आणि मी दोघेही खेळाडू आहोत. त्यामुळे आमचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. शनिवारी दुपारीही आमची भेट झाली, असे शेख यांनी स्पष्ट केले. तर, आयुक्तांना याबाबत व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nfbrTX
No comments:
Post a Comment