Breaking

Monday, December 21, 2020

ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक, गुन्हा दाखल https://ift.tt/2J9fIcH

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अभिनेत्री व शिवसेनानेत्या यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केल्याप्रकरणी मुंबईच्या ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. उर्मिला यांनी यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. उर्मिला यांचे इन्स्टाग्रामवरील अकउंट १६ डिसेंबर रोजी हॅक करण्यात आले होते. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती. 'माझे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. मला इनबॉक्समध्ये मेसेज आला होता. काही स्टेप्सना फॉलो करायला सांगितले. अकाउंट वेरिफाय झाले आणि लगेच ते हॅक झाले.. खरंच?', असे ट्विटमध्ये उर्मिला यांनी म्हटले होते. अकाउंट हॅक झाल्याचे समजताच उर्मिला यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून उपायुक्त रश्मी करंदीकर यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली. या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत सोमवारी गुन्हा दाखल केला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सायबर पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hbfcr6

No comments:

Post a Comment