नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची कोंडी सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. आज, शुक्रवारी देशातील साधणार असून, हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. पंतप्रधान शेतकरी योजनेच्या पुढील टप्प्यासाठी १८ हजार कोटी रुपयांची घोषणाही पंतप्रधान आजच्या कार्यक्रमात करण्याची शक्यता आहे. या दुपारी १२.०० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदारांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आदेश दिले असून, दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होण्यासाठी सर्व राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांना पत्र पाठविण्यात आली आहेत. भाजपचे सर्व वरिष्ठ मंत्री कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गृहमंत्री अमित शहा दिल्ली येथील गोशालेत उपस्थित राहणार असून, तेथे शेतकऱ्यांच्या गटाशी ते संवाद साधतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विविध ठिकाणी मोठे एलईडी स्क्रीन उभारणार असल्याचे सांगितले असून, पंतप्रधानांचा शेतकऱ्यांशी संवादाचा कार्यक्रम 'लाइव्ह' दाखविण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा स्तरावर स्थानिक बाजारसमित्या आणि मंडींमध्येही कार्यक्रम दाखविण्यात यावा, याची तयारी करण्यात आली आहे. विविध भाषांमध्ये कृषी कायद्यांचे फायदे भाषांतरित करण्यात आले असून, त्याची पत्रकेही वाटली जाणार आहेत. ही सर्व पत्रके सविस्तर स्वरूपात असून, शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत माहिती देण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WGkAt8
No comments:
Post a Comment