Breaking

Monday, December 21, 2020

घातवार ; सोमवारच्या धसक्यातून बाजार सावरणार का? https://ift.tt/2KJgZYC

मुंबई : नव्या करोनाने ब्रिटनमध्ये लागू झालेली टाळेबंदी आणि त्यातून जगभरातील भांडवली बाजारात झालेल्या पडझडीत गुंतवणूकदार होरपळून निघाला आहे. गुंतवणूकदारांसाठी कालचा दिवस 'ब्लॅक मंडे' ठरला. काल गुंतवणूकदारांनी सात लाख कोटींचे नुकसान सोसले. आज मंगळवारी सकाळी आशियातील भांडवली बाजारांनी मात्र नकारात्मक सुरुवात केली आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) १४०६.७३ अंकांनी कोसळून ४५,५५३.९६च्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही (निफ्टी) ४३२.१५ अंकांनी गडगडून १३,३२८.४०च्या पातळीवर स्थिरावला. या पतनामुळे मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सर्वच निर्देशांकांमध्ये घसरण झाली. त्यामुळे ‘बीएसई’वर नोंदवल्या गेलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य सात लाख कोटी रुपयांनी घटले. दरम्यान मागील ११ सत्रात तेजी नोंदवणाऱ्या निफ्टीमध्ये काल ४०० अंकाची घसरण झाली. मात्र यातून निफ्टी सावरेल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्यास गुंतवणूकदार खरेदीसाठी पुढाकार घेईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिटनहून येणारी विमाने भारतासह फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया आणि इटली यांनी ३१ डिसेंबरपर्यंत बंद केली. त्यामुळे विमान वाहतूक व्यवसायावर विपरित परिणाम दिसून आला. त्यातच नाताळच्या सुट्ट्यांचा काळ विविध देशांत सुरू होत असल्यामुळे त्याचाही बाजारांवर परिणाम दिसून आला. सोमवारी पॅरिस, फ्रँकफर्ट आणि लंडन येथील शेअर बाजार २.५० टक्के खाली आले. हाँगकाँग आणि टोकियो येथील बाजारही घसरले. शांघाय आणि सोल येथील भांडवल बाजारांनी संमिश्र वाटचाल केली. ‘सेन्सेक्स’च्या सर्वच्या सर्व तीस घटक कंपन्यांना तोटा सहन करावा लागला. त्यातही ‘ओएनजीसी’चा समभाग सर्वाधिक ९.१५ टक्के आपटला. इंड्सइंड बँक, महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक, एनटीपीसी, आयटीसी, अॅक्सिस बँक आणि पॉवरग्रिड या कंपन्यांचे समभाग ६.९८ टक्क्यांपर्यंत खाली आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र संकेतांमुळे सोमवारी बाजार उघडताच देशांतर्गत बाजारांमध्ये घसरण दिसून आली. ‘सेन्सेक्स’ १८० अंकांनी घसरून ४६,७८०च्या आसपास आणि ‘निफ्टी’ ५८ अंकांनी घसरून १३,७०२च्या पातळीवर गेला. त्यानंतर बाजारात तेजी परतली आणि जवळपास १०.३०च्या सुमारास ‘सेन्सेक्स’ने ४७ हजारांच्या आजवरच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. त्याच वेळी ‘निफ्टी’नेही उच्चांकाला स्पर्श केला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3h7h3xg

No comments:

Post a Comment