: करोनाकाळात केंद्र सरकारकडून विधेयकाद्वारे लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याचा प्रखर विरोध शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. हा कायदा मागे घेण्याची मागणी करत गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर आहेत. आज (शनिवारी) या आंदोलनाचा नववा दिवस आहे. पंजाब हरयाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आणि निरंकारी मैदानात ठाण मांडलंय. याच दरम्यान बिहारमध्येही या कायद्याचा विरोध होतोय. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी कायद्याच्या विरोधासाठी शेतकरी आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरलेत. या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशानं महाआघाडीतील अनेक घटक पक्ष आज पाटण्याच्या गांधी मैदानात धरणं आंदोलन करणार आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते यांच्यासहीत अनेक काँग्रेस आणि इतर दलांचे नेतेही सहभागी होणार आहेत. वाचा : वाचा : वाचा : केंद्रानं ज्या पद्धतीचा कायदा लागू केलाय त्याच पद्धतीचा कायदा अगोदरपासूनच बिहारमध्ये लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यामुळे बिहारच्या शेतकऱ्यांचं केवळ नुकसानच झालंय. त्यामुळे बिहारकडून केंद्रानं धडा घ्यावा आणि हा नवा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी बिहारच्या विरोधी नेत्यांकडून करण्यात आलीय. पाटणाच्या गांधी मैदानात गांधी मूर्तीसमोर धरणं आंदोलनासंबंधी तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेद्वारे सूचना दिली होती. शेतकऱ्यांच्या मनात या कायद्याविरोधात रोष आहे. आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहोत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा सरकारकडून केला जातोय. परंतु, किमान हमीभाव देण्याची तरतुदही केली जात नसेल तर दुप्पट उत्पन्न सोडाच पण शेतकऱ्यांना नुकसानंच सहन करावं लागेल, असं विरोधकांनी म्हटलंय. वाचा : वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gaSe37
No comments:
Post a Comment