म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य सरकारच्या खरेदी व विक्री कक्षाकडून प्रलंबित राहिलेली औषधविक्रेत्यांची बिले न दिल्यामुळे कोट्यवधी प्रलंबित देयके मंजूर न झाल्यामुळे औषध वितरकांनी औषध वितरण थांबवण्याचा तसेच नवीन निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील रुग्णालयांमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या खरेदी व विक्री कक्षाकडून आलेल्या मागणीनुसार २०१९-२० मध्ये कोट्यवधीची औषधे निविदा प्रक्रियेतून वितरकांकडून खरेदी केली होती. मात्र वर्ष उलटले तरी या औषधांची देयके राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली नाहीत. ही देयके मंजूर व्हावी यासाठी औषध वितरकांकडून वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही देयके मंजूर न केल्यास औषध पुरवठा थांबवण्याचा इशारा ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनने राज्य सरकारला दिला होता. खरेदी व विक्री कक्षाला निधीअभावी रक्कम देणे शक्य नसल्याने वर्षभरापासून कोट्यवधींची देयके रखडल्याने वितरकांनी पुढील व्यवहार करणे शक्य होत नाही. ती मंजूर झाल्याशिवाय औषधांचा पुरवठा करणार नाही, असा ठाम निर्णय घेतला असल्याची माहिती ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी 'मटा'ला दिली. औषध वितरकांच्या या निर्णयामुळे राज्यातील एकोणीस वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील औषधपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात हाफकीनचे औषध खरेदी व विक्री विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. आर. एम. कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. चर्चा होऊनही निर्णय नाही सोमवारी यासंदर्भात झालेल्या चर्चेमध्ये हाफकिन बायोफार्मास्युटीकलचे संचालक देयके मंजूर करण्यासंदर्भातील मान्यता घेण्यासाठी सचिवांकडे गेल्याचे खरेदी व विक्री कक्षाकडून सांगण्यात आले. मात्र मान्यतेबाबत काहीही सांगण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या औषध वितरकांकडून अखेर सायंकाळी सहा वाजल्यापासून औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oMPJH6
No comments:
Post a Comment