Breaking

Saturday, December 5, 2020

महापरिनिर्वाणदिन: येथूनच होतो आज नतमस्तक तुमच्या चरणी! https://ift.tt/37DoQi6

म. टा. प्रतिनिधी, मुंबई भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायांचा जनसागर उसळतो. यंदा करोनाचे संकट असल्याने चैत्यभूमीवर न येता आपापल्या घरातून बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. चैत्यभूमीवर शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टी होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि पालिकेच्या समाजमाध्यमांवरून करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४वा आज, रविवारी, ६ डिसेंबर रोजी आहे. या निमित्ताने परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करता यावे, यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर १० मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरून ऑनलाइन थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी bit.ly/abhivadan2020yt / फेसबुक : bit.ly/abhivadan2020fb / ट्विटर : bit.ly/abhivadan2020tt या युट्युब लिंक उपलब्ध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची तसेच महापरिनिर्वाण दिन तयारीबाबतची माहिती देणारी पुस्तिका पालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते शनिवारी चैत्यभूमी लगतच्या नियंत्रण कक्षात करण्यात आले. ही पुस्तिका पालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर आहे. पॅगोडा उद्यापर्यंत बंद महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणारे हजारो अनुयायी गोराई येथील 'ग्लोबल पॅगोडा'ला भेट देतात. यंदा मुंबईवर करोनाचे संकट असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून उद्या, सोमवारपर्यंत पॅगोडा बंद ठेवण्यात येणार आहे. तरी, अनुयायांनी या कालावधीत पॅगोडाला येऊ नये. करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे उपायुक्त विश्वास शंकरवार व 'ग्लोबल पॅगोडा'चे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mQqT8P

No comments:

Post a Comment