Breaking

Wednesday, December 30, 2020

रेंज मिळत नव्हती म्हणून मोबाइल घेऊन ट्रेनच्या दरवाजात आले आणि... https://ift.tt/38M5RSV

म. टा. प्रतिनिधी, मुंबई लोकलच्या दरवाज्यात उभे राहून फोनवर बोलणाऱ्या प्रवाशांचा मोबाइल हिसकावत धावत्या गाडीतून उडी मारून चोर पसार झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार भर दुपारी स्थानकात घडला. यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाचा: बेस्टमध्ये काम करत असलेले ५१ वर्षीय मनोज भीमसेन जाधव हे कामानिमित्त प्रवास करत होते. २९ डिसेंबरला दुपारी ४.२० वाजता त्यांना कामावरून फोन आला. लोकलमध्ये अस्पष्ट आवाजामुळे बोलणे होत नव्हते. स्पष्ट आवाजासाठी लोकलच्या दरवाज्याजवळ जाऊन ते फोनवर बोलत होते. त्याचवेळी मध्यम बांधा आणि तोंडावर रुमाल बांधलेल्या व्यक्तीने त्यांच्या हातून मोबाइल खेचत कुर्ला फलाटावर उडी मारून पळ काढला. काही समजण्याच्या आतच चोराने मोबाइल लांबवला. लोकलने वेग घेतल्यामुळे हताशपणे पाठमोऱ्या चोराकडे जाधव बघत राहिले. या चोरीनंतर जाधव यांनी गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. रेल्वे पोलिसांनी त्यांना अज्ञात व्यक्तीच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक ७ आणि ८ वरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहेत. तसेच धावत्या लोकलमधून उडी मारून करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात येईल, असे वडाळा रेल्वे पोलिसांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pGZyXP

No comments:

Post a Comment