Breaking

Tuesday, December 29, 2020

आंगणेवाडी यात्रेसाठी यंदा एसटीच्या विशेष गाड्या नाहीत! https://ift.tt/38Pvgvf

म. टा. प्रतिनिधी, मुंबई कोकणवासीयांसाठी मानाच्या आणि तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भराडी देवीच्या यंदा करोनासंकटामुळे साधेपणाने होणार आहे. या पार्श्वभूमीवर आंगणेवाडीसाठी कोणत्याही विशेष एसटी धावणार नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे यात्रेनिमित्त स्थानिकांना मिळणारा रोजगार बुडणार असून एसटी महामंडळालादेखील लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. नवसाला पावणारी देवी अशी भराडीदेवीची ख्याती आहे. नवीन वर्षाची चाहुल लागताच मुंबईतील चाकरमान्यांना आंगणेवाडी यात्रेचे वेध लागतात. गेले नऊ महिने करोनामुळे देवदर्शन, यात्रा-उत्सव बंद आहेत. किमान नव्या वर्षात ते सुरू व्हावेत, अशी सामान्यांची भावना आहे. परंतु, ६ मार्चला होणाऱ्या आंगणेवाडी यात्राही करोनाचे सावट असल्याने यंदा ही यात्रा यंदा केवळ आंगणे कुटुंबीयांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरूपात पार पडणार आहे. या यात्रेला दरवर्षी साधारणपणे १२-१५ लाख भाविक-पर्यटक येतात. त्यामुळे तीन महिन्यांआधीच महामंडळाचे नियोजन सुरू होते. कोकणात जादा गाड्या सोडण्यासह ब्रेकडाऊन व्हॅन, चालक-वाहकांच्या ड्युटी नियोजनाचे काम लागते. गेल्या वर्षी यात्रेनिमित्त शेकडो विशेष एसटी फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. यातून महामंडळाच्या तिजोरीत २५ ते २७ लाखांची भर पडली होती. मात्र यंदा यात्राच भव्य स्वरूपात होणार नसल्याने अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार नाही, असे एसटी महामंडळातील वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, अनेक राजकीय पदाधिकारी, आमदार-खासदार, नगरसेवक, महापौर, उद्योजक हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दरवर्षी चाकरमानीही मोठ्या संख्येने आवर्जून आंगणेवाडी यात्रेत सहभागी होतात. यावर्षी मात्र यात्रा मर्यादित स्वरूपातच साजरी होणार असल्याने ही गर्दी दिसणार नाही. या पार्श्वभूमीवर, 'भाविकांना होणाऱ्या गैरसोईबद्दल आम्ही दिलगीर आहोत. त्यांनी असलेल्या ठिकाणाहून देवीला आपले सांगणे सांगावे. देवी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल', असे आंगणे कुटुंबीयांनी म्हटले आहे. आर्थिक अडचणी वाढणार? राज्यातील शहरी भाग वगळता ग्रामीण आणि निमशहरी भागात यात्रा-उत्सव यांवर अवलंबून असलेला रोजगार मोठ्या प्रमाणावर आहे. तसेट यात्रा-उत्सवातील होणाऱ्या वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीतही वर्षाला हजारो कोटींची भर पडते. नव्या वर्षातही यात्रा उत्सवांवरील निर्बंधांमुळे महामंडळाच्या आर्थिक अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2KZE89b

No comments:

Post a Comment