Breaking

Thursday, December 3, 2020

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण: एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित https://ift.tt/3g8Y7O9

म.टा. प्रतिनिधी, मुंबई अमली पदार्थ प्रकरणात नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये सरकारी वकील अतुल सरपांडे व अन्य एका तपास अधिकाऱ्याचा समावेश आहे. सिनेसृष्टीशी संबंधित करिश्मा प्रकाश, विनोदी अभिनेत्री भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचिया या तिघांच्या घरावर एनसीबीच्या चमूने छापा टाकला. त्यामध्ये या तिघानांही अमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती. परंतु या तिघांनाही जामीन मिळवून देण्यासाठी तपासात हयगय केल्याचा एनसीबी अधिकाऱ्यांवर ठपका आहे. सरकारी वकील अतुल सरपांडे हे सुनावणीवेळी जाणूनबुजून गैरहजर राहिले आणि त्यामुळेच आरोपींना जामीन मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एनसीबी मुंबईचे क्षेत्रीय संचालक यांनी ही कारवाई केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2L6uZf7

No comments:

Post a Comment