Breaking

Thursday, December 3, 2020

'बेस्ट'चे पुढचे पाऊल; तब्बल २६ इलेक्ट्रिक बस आजपासून ताफ्यात https://ift.tt/3g92XLi

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना कालावधीपासून मुंबईकरांना उत्तम सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमात आज, शुक्रवारपासून २६ इलेक्ट्रिक बसची भर पडणार आहे. या ताफ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज, शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता नरिमन पॉइंट येथील मुरली देवरा चौक येथे होणार आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणास आळा घालण्यासह इंधन बचतीसाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या २६ एसी दाखल झाल्या आहेत. या सर्व २६ बस लगेचच शुक्रवारपासून सेवेत दाखल होणार आहेत. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयांतर्गत 'फेम' अंतर्गत (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक वेहिकल्स) इलेक्ट्रिक बस योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार 'फेम'कडून राज्यांना इलेक्ट्रिक बससाठी सबसिडी दिली जाते. त्यानुसार, आत्तापर्यंत राज्यात बेस्ट, एसटी, नवी मुंबई परिवहन सेवेसह गोवा, गुजरातमध्ये राजकोट, सुरत आणि चंदीगडमध्ये एकूण ६७० इलेक्ट्रिक बस देण्यात येणार आहे. त्यात बेस्टच्या वाट्याला ४० बस आल्या आहेत. यापैकी २६ एसी इलेक्ट्रिक बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यापूर्वी बेस्टमध्ये भाडेतत्त्वावरील ४० आणि स्वमालकीच्या सहा इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात कार्यरत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3g88h1p

No comments:

Post a Comment