Breaking

Thursday, December 31, 2020

नव्या वर्षाची सुरुवात ; पेट्रोल आणि डिझेलचा ग्राहकांना दिलासा https://ift.tt/3n1ESb7

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज १ जानेवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. इंधन दर जैसे थेच ठेवला आहे. दरम्यान, सलग २५ व्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल झाला नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत शुक्रवारी एक लीटर पेट्रोलचा भाव ९०.३४ रुपये आहे. तर एक लीटर ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. दरम्यान सलग २४ व्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवल्याने ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. याआधी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात तब्बल ४८ दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून १५ वेळा इंधन दरवाढ झाली. ज्यात पेट्रोल २.५५ रुपयांनी महागले. तर याच कालावधी १२ वेळा डिझेल दरवाढ झाली. ज्यात डिझेलचा भाव ३.४१ रुपयांनी वधारला. दरम्यान आज सिंगापूरमध्ये क्रूडचा भाव ०.१२ डॉलरने वधारला असून तो प्रती बॅरल ४८.५२ डॉलर झाला आहे. ब्रेंट क्रूडच्या किमतीत ०.१७ डॉलरची वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ५१.८० डॉलर झाला आहे. नव्या वर्षात लसीकरणाने करोना साथ आटोक्यात येईल असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे. अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान झाल्यास तेलाची मागणी वाढेल. कच्च्या तेलाचा भाव ६० डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज सिटी बँकेच्या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक बाजारात आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेजी दिसून आली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Mgtzz6

No comments:

Post a Comment