म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यामुळे आज, मंगळवारी मध्यरात्रीनंतर तेथून येणारी बंद करण्यात येत आहे. मात्र तत्पूर्वी मुंबईत सोमवार मध्यरात्रीपासून पाच विमाने येणार आहेत. या विमानांतून एक हजारांहून अधिक प्रवासी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने शहरातील विविध हॉटेलांमध्ये दोन हजार खोल्या सज्ज ठेवल्या आहेत. यामध्ये एक हजार खोल्या फाइव्ह आणि फोर स्टार हॉटेलमधील आहेत, तर एक हजार खोल्या त्या खालील हॉटेलांतील आहेत. विमानाने येणाऱ्या या सर्व प्रवाशांना सात दिवस हॉटेलमध्ये विलगीकरणात रहावे लागणार आहे. हॉटेलात राहण्याचे शुल्क प्रवाशांनाच भरावे लागणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त यांनी दिली आहे. बुधवारपासून युरोप खंडातील इतर देशांमधून तसेच मध्य पूर्व आशिया खंडातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना पालिकेच्या केंद्रांमध्ये सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे करण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. अमेरिकेसह, दक्षिण मध्य आशिया खंडातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे त्यांच्या घरातच विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यांच्या हातावर तसे शिक्केही मारण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. परदेशातून मुंबईत आलेल्या प्रत्येक प्रवाशाला मुंबईतच विलगीकरणात रहावे लागणार आहे. मुंबईबाहेर राहाणाऱ्या प्रवाशांना सात दिवस घरी जाण्याची परवानगी मिळणार नाही. इंग्लडहून आलेल्या प्रवाशांचे सात दिवस हॉटेलमध्ये विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यांची पाचव्या आणि सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करुन घरी पाठविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. रुग्णालयांत स्वतंत्र व्यवस्था प्रवाशांची विमानतळावर प्राथमिक तपासणी होणार असून यात लंडनमधील प्रवाशांमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास त्यांना सेव्हन हिल्स आणि युरोपच्या इतर देशांसह मध्य पूर्व आशिया खंडातील देशातील रुग्णांमध्ये लक्षणे आढळ्यास त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WB7aOV
No comments:
Post a Comment