Breaking

Wednesday, December 30, 2020

'शाहीनबाग'मधील हल्लेखोराला भाजपकडून प्रवेश-हकालपट्टी https://ift.tt/3rGowYV

नवी दिल्ली : शाहीनबाग येथे करणाऱ्या याने बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे वृत्त पसरताच विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर त्याची हकालपट्टी करण्यात आल्याची सारवासारव पक्षाकडून करण्यात आली. याबाबतचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. शाहीनबाग आंदोलकांवर गेल्या वर्षी एक फेब्रुवारीला कपिल गुर्जर याने दोन गोळ्या झाडल्या होत्या. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. गुर्जरच्या पक्षप्रवेशाबाबतच्या गोंधळाबाबत गाझियाबादचे जिल्हाध्यक्ष संजीव शर्मा यांनी खुलासा केला. ते म्हणाले, 'बहुजन समाज पक्षातील कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच गुर्जरही होता. शाहीनबाग आंदोलकांवर त्याने गोळीबार केल्याबाबत आम्हाला माहिती नव्हती.' विरोधी पक्षांकडून जोरदार टीका झाल्यानंतर गुर्जरचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2L5wpXk

No comments:

Post a Comment