वृत्तसंस्था, हैदराबाद : ब्रिटनवरून परतलेली आणि असलेली महिला दिल्ली विमानतळावरून अचानक गायब झाली. ही घटना २१ डिसेंबर रोजी घडली होती. संबंधित महिला आंध्र प्रदेशमधील राजमुंदी येथे गुरुवारी सापडली. महिलेला आणि तिच्या मुलाला आरोग्य अधिकाऱ्यांनी राजमुंद्री रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. 'संबंधित महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत. तिचा मुलगा दिल्लीपासून राजमुंद्रीपर्यंत तिच्यासोबत होता. त्याचीही करोनाचाचणी केली जाणार आहे. त्यांना सध्या जिल्हा रुग्णालयाच्या विशेष विभागात ठेवण्यात आले आहे,' अशी माहिती पूर्वा गोदावरी जिल्हा आरोग्यसेवा समन्वयक डॉ. टी. रमेश किशोर यांनी दिली. राहण्याची सूचना दिलेली असताना ती महिला निघून का गेली, याबाबत अद्याप तिची चौकशी होणे बाकी आहे, असेही त्यांनी सांगितले. महिलेला लागण झालेला विषाणू नवीन आहे का, याबाबत तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, असाच एक प्रवासी बाधित असतानाही पंजाबमध्ये गेल्याचे दिसून आले आहे. कर्नाटकात संचारबंदीचा निर्णय मागे दुसरीकडे, कर्नाटकात रात्रीची लागू करण्याचा निर्णय गुरुवारी मागे घेण्यात आला. गुरुवारपासून (२४डिसेंबर) या निर्णयाची अंमलबजावणी होणार होती. मात्र, लोकांनी यावर मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी निवेदनाद्वारे निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rqTpAA
No comments:
Post a Comment