Breaking

Sunday, January 31, 2021

Budget 2021 Income Tax अपेक्षांचा संकल्प ; आयकर बदल धूसर मात्र कर सवलतींनी नोकरदारांना खूश करणार https://ift.tt/3oBUqTU

मुंबई : करोना संकटाने वाढलेला अवास्तव खर्च आणि तिजोरीतील खडखडाट यामुळे आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात आयकर रचनेत बदल होण्याची शक्यता कमी आहे. करमुक्त उत्पन्न मर्यादा वाढवणे किंवा कर कपात करण्याऐवजी निर्मला सीतारामन या कर वजावटी जाहीर करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नव्या कर रचनेत ५ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त आहे. ५ ते ७.५ लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के, ७.५ ते १० लाखांवर १५ टक्के, १० ते १२.५ लाखांवर २० टक्के कर आकारला जाणार आहे. त्याआधीच्या वर्षी ५ ते १० लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के, १० ते १५ लाखांवर ३० टक्के कर होता. जुन्या आयकर रचनेनुसार २.५ लाखांपर्यंत उपन्न करमुक्त आहे. तर २.५ लाख ते ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर आहे. ५ लाख ते १० लाखांपर्यंत उत्पन्नावर २० टक्के आणि १० लाखांपुढील उत्पन्नावर ३० टक्के कर आहे. दरम्यान, नव्या कर रचनेला आणखी आकर्षक करणे आवश्यक आहे, असं मत सनदी लेखापाल संतोष कदम यांनी व्यक्त केले. ते म्हणाले कि, नव्या कर रचनेत करदात्याला २२ते २५ कर वजावटींवर पाणी सोडावे लागते. त्यामुळे त्याला त्याबदली इतर सवलती आवश्यक आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार याबाबत नक्कीच विचार करेल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. सध्या कोणती कर व्यवस्था निवडायची, हे करदात्यावर अवलंबून आहे. कोणी आधीचे टॅक्स स्लॅब निवडू शकते आणि सध्याची कपात कायम ठेवू शकते. वैकल्पिक रुपाने करदाता नवी कर व्यवस्थेअंतर्गत स्लॅब-लिंक्ड कमी करून दरांचा पर्याय निवडू शकतो आणि कपात करू शकतो. पण केंद्रिय बजेट २०२१-२०२२ मध्ये हा पर्याय काढला जाण्याची शक्यता नाही असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट ज्योती रॉय यांनी व्यक्त केले. सरकारने प्राप्तिकर अधिनियमच्या ८० क अंतर्गत १५०,००० रुपयांच्या सध्याच्या मर्यादेवर कर सवलत वाढवण्याच्या शक्यतेवर व्यापक चर्चा केली आहे. म्हणजेच अतिरिक्त करमुक्त उत्पन्न- निश्चित स्वरुपात एक कर-बचतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक वाढवेल. सामान्य माणसाने लॉकडाऊनच्या काळात आणि वेतन कपातीमुळे तसेच घरून काम करण्याच्या वातावरणात नोकरी करण्यासाठी अतिरिक्त खर्च केला. त्यामुळे पगारदार कर्मचारी प्राप्तिकर सवलतीसाठी खूप आशेसह बजेटची प्रतीक्षा करत आहेत, असे त्यांनी सांगितले. नवीन कर रचना आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी
उत्पन्न आयकर (टक्के)
५ लाखांपर्यंत
५ लाख ते ७.५ लाखांपर्यंत १०
७.५ लाख ते १० लाखांपर्यंत १५
१० लाख ते १२.५ लाखांपर्यंत २०
१२.५ लाख ते १५ लाखांपर्यंत २५
१५ लाखांहून अधिक ३०
सध्याची जुनी कर रचना
उत्पन्न कर (टक्के)
२.५ लाखांपर्यंत
२.५ लाख ते ५ लाखांपर्यंत
५ लाख ते १० लाखांपर्यंत २०
१० लाखांहून अधिक ३०


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3tfDjLa

No comments:

Post a Comment