Breaking

Saturday, January 2, 2021

ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार; शिवसैनिक मुंबईत दाखल होणार https://ift.tt/2JExLrD

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई प्रताप सरनाईकांपाठोपाठ यांना ईडीची नोटीस आल्याने आता आक्रमक झाली असून, ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. ५ जानेवारीला मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, तसेच खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचे समजते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी यांनाही ईडीची नोटीस पाठवली आहे. याआधी प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. ईडीच्या नोटिसा म्हणजे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारचे षडयंत्र असल्याचा शिवसेनेने आरोप केला होता. त्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीलाही ईडीची नोटीस आल्यानंतर राऊत यांनी आणि त्यानिमित्ताने केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. ५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेनेने ईडीच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यायचे ठरविल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचे समजते. येत्या ५ जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचे समजते. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस तसेच खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. येत्या ५ जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असून, त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर राहणार असल्याचे समजते. शिवसेनेकडून एकप्रकारचे शक्तिप्रदर्शनच केले जाणार असल्याचे समजते. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा कशाप्रकारे गैरवापर करीत आहे हेच यातून शिवसेनेला दाखवायचे असल्याचे समजते. दरम्यान, याआधी शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यालय असल्याचा बॅनर लावून भाजपवर टीका केली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rQHoVa

No comments:

Post a Comment