कराड: राज्याचे माजी सहकारमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर तालुक्यातील उंडाळे या गावी आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विलासकाकांनी १९६२ मध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी सलग ३५ वर्षे प्रतिनिधित्व केलं. पुरोगामी विचारांचे व काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले नेते अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. तब्बल १२ वर्षे मंत्री म्हणून त्यांनी वेगवेगळ्या खात्यांची धुरा सांभाळली होती. सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास अशा अनेक खात्यांचे काम त्यांनी पाहिले होते. अनेक सहकारी संस्थांची उभारणीही त्यांनी केली होती. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसनं कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळं नाराज झालेल्या विलासकाकांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र, पराभवानंतरही साताऱ्याच्या राजकारणातील त्यांचं महत्त्व कायम होतं. कालांतरानं त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन पक्षहितासाठी चव्हाण यांच्याशी जुळवून घेतलं होतं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hI5CfY
No comments:
Post a Comment