Breaking

Thursday, January 28, 2021

धनंजय मुंडे व त्यांच्या 'लिव्ह इन पार्टनर'मधील वाद आता मध्यस्थांसमोर https://ift.tt/3puRw4D

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सामाजिक न्यायमंत्री यांनी त्यांच्यासोबत म्हणून राहिलेल्या महिलेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर आपसातील वाद परस्पर सामंजस्याने मिटवण्याचे ठरल्याने आता हे प्रकरण मध्यस्थांसमोर जाणार आहे. मुंडे व महिलेतर्फे गुरुवारी न्या. ए. के. मेनन यांच्यासमोर परस्पर सहमतीचे मुद्दे सादर करण्यात आले. त्यानुसार, हे प्रकरण आता न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थांसमोर जाईल. विवाहित व दोन मुली असलेल्या मुंडे यांना या महिलेपासून एक मुलगा व मुलगी आहे. त्या दोघांनाही आपण आपले नाव दिले असल्याचे मुंडे यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. लिव्ह-इन-पार्टनर म्हणून राहिलेल्या महिलेने काही महिन्यांपूर्वी मुंडे यांच्यासोबतचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. त्यामुळे मुंडे यांनी ४ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात तिच्याविरोधात अब्रुनुकसानीचा व भरपाईचा दावा दाखल केला. नंतर मुंडे यांनी केवळ महिलेला आपल्यासोबतचे खासगी फोटो, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग हे फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर तसेच इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियामध्ये प्रसिद्ध करण्यास मनाई करावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. त्याप्रमाणे न्यायालयाने १६ डिसेंबर, २०२० रोजी तसा सशर्त मनाई आदेश काढला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी हे प्रकरण परस्पर सामंजस्याने मिटवण्यास दोन्ही बाजूंनी सांगण्यात आल्यानंतर न्या. मेनन यांनी परस्पर सहमतीचे मुद्दे सादर करण्यासाठी हा विषय गुरुवारी सुनावणीस ठेवला होता. त्यानुसार, मुंडे यांच्यातर्फे अॅड. शार्दुल सिंग व महिलेतर्फे अॅड. ए. आर. शेख यांनी मुद्दे सादर केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ahIHVv

No comments:

Post a Comment