Breaking

Monday, February 22, 2021

'त्या' प्रकरणानंतर राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधील कटुता वाढली! https://ift.tt/37GR24i

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यपाल यांच्याशी असलेल्या विसंवादामुळे मुख्यमंत्री यांच्याकडून राजभवनवरील हेलिपॅडचा वापर करणे टाळले जात आहे. सोमवारी रायगड दौऱ्यावर जाताना मुख्यमंत्र्यांनी राजभवनवरील हेलिपॅडऐवजी महालक्ष्मी रेसकोर्सवरील हेलिपॅडचा वापर केला. गेल्या १० दिवसांत मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा हवाई प्रवास केला आणि दोन्ही वेळेला राजभवनवरील हेलिपॅडचा वापर टाळला. वाचा: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अलिकडेच उत्तराखंडमधील नियोजित कार्यक्रमास जाण्यासाठी राज्य सरकारने तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन विमानसेवा नाकारली होती. यामुळे राज्यपालांना सरकारी विमानातून पायउतार व्हावे लागले होते. मुख्यमंत्री कार्यालय आणि यांच्यातील विसंवादामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा नंतर सर्वत्र रंगली होती. राज्यपालांना राज्य सरकारकडून विमान उपलब्ध न झाल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी घडला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पालघर दौरा होता. मात्र मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरने राजभवनऐवजी महालक्ष्मी रेसकोर्सवरील हेलिपॅडवरून उड्डाण केले. वाचा: वर्षा निवासस्थान ते राजभवन यामध्ये अवघ्या १० मिनिटांचे अंतर आहे, तर महालक्ष्मी रेसकोर्सकडे जाण्यास त्याच्या दुप्पट वेळ लागू शकतो. मात्र राज्यपालांना राज्याचे विमान उपलब्ध न झाल्याने आता राजभवन येथील हेलिपॅडचा वापर करण्याची परवानगी ते देतील की नाही असा विचार करून मुख्यमंत्री कार्यालयातील सनदी आधिकाऱ्यांनी राजभवनवरील हेलिपॅडचा वापर टाळण्याचा सल्ला दिल्याचे समजते. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3siXC9g

No comments:

Post a Comment