Breaking

Wednesday, February 3, 2021

'तो' बिल्डर उद्धव ठाकरेंचा परममित्र आहे म्हणूनच... https://ift.tt/39LAXfj

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुलुंड येथे पाच हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याच्या १२ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी मुलुंड येथील श्वास बिल्डर्स या विकासकाला २१०० कोटी रुपये देऊन जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेचे आयुक्त यांनी राज्य सरकारला पाठवला होता. याप्रकरणी भाजपचे माजी खासदार यांनी मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महापालिका आयुक्त चहल यांची हकालपट्टी करण्याची मागणीही सोमय्या यांनी यावेळी केली. वाचा: सोमय्या म्हणाले, 'हा प्रकल्प मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा 'ड्रीम प्रॉजेक्ट' आहे, असेही या प्रस्तावात आयुक्तांनी म्हटले होते. श्वास बिल्डर्स हा विकासक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा परममित्र असून त्याच्याकडून ही जागा खरेदी करण्याचा घाट होता. परंतु आम्ही राज्यपालांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर राज्यपालांनी लोकायुक्तांना या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त चहल यांनी मागे घेत असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले. ही जागा खरेदी करून आपल्या विकासक भागीदाराला तसेच स्वतःला फायदा करून घेण्याचे हे कारस्थान होते.' याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर द्यावे, तसेच मुंबई महापालिका आयुक्त चहल यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी केली. वाचा: ही जागा रुग्णालयासाठी संपादन करायची असून याला फास्ट ट्रॅकवर मंजुरी मिळावी, असेही महापालिका आयुक्तांनी प्रस्तावात म्हटले होते. मात्र याची चौकशी करण्याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली असता, राज्यपालांनी लोकायुक्तांना या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर यावर्षी ११ जानेवारी रोजी मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी राज्य सरकारला एक पत्र पाठवले. या पत्रात, महापालिका स्तरावर रुग्णालयासाठी जागा निश्चित करण्याची कार्यवाही होणार नाही. याबाबतचे सगळे प्रस्ताव रद्द करण्यात येत आहेत. तसेच संबंधित विकासकाचे डिपॉझिट परत देण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्तांनी नमुद केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त हे मुंबईतील जनतेला मूर्ख समजत आहेत का, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36FMdbf

No comments:

Post a Comment