: राजस्थानच्या जोधपूर तुरुंगात बंद असलेल्या आसारामची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्याला करण्यात आलंय. श्वासोच्छवासाचा त्रास जाणवल्यानंतर त्वरीत आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. '' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोषीवर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. मंगळवारी रात्री तुरुंगात अचानक आसाराम याची तब्येत अचानक बिघडली. श्वासोच्छवासात अडथळे जाणवल्यानंतर तुरुंगातील डिस्पेन्सरीमध्ये एक तास त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले. परंतु, त्यानंतरही त्रास कायम राहिल्यानं त्याला त्वरीत महात्मा गांधी रुग्णालयात त्वरीत हलवण्यात आलं. रक्तदाबादाचा त्रास होतोय, श्वासोच्छवासात अडथळे जाणवत आहेत तसंच गुडघेही काम करत नाहीत, अशी तक्रार आसारामनं केली होती. आसारामला पूर्ण वेळ एक्स-रे रुममध्ये ठेवण्यात आलंय. इथे त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. शिवाय कार्डिओलॉजी डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आलं. एक्स-रे नंतर आसारामची स्कॅनिंगही करण्यात आली. त्याचा ईसीजी रिपोर्ट सामान्य आहे. आसारामला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजताच त्याचे काही भक्तदेखील रुग्णालयात पोहचले. पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर आसारामला महात्मा गांधी रुग्णालयातून मथुरादास माथुर रुग्णालयातील सीसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. इथेही त्याचे समर्थक मोठ्या संख्येत दाखल झाल्यानं पोलिसांनी सुरक्षाही वाढवली. लैंगिक शोषण प्रकरणात गेल्या आठवड्यात राजस्थान उच्च न्यायालयाकडून जोधपूरमध्ये आसाराम प्रकरणात सुनावणी होणार होती. परंतु, आसारामकडून वकिलांना मुंबईला दाखल व्हावं लागणार होतं. वकील पोहचले नाहीत त्यामुळे वकिलांनी सुनावणी टाळण्याची विनंती केली होती. आता त्याच्या अर्जावर ८ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. जोधपूरनजिकच्या आश्रमात २०१३ साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०१३ मध्ये आसारामला मध्य प्रदेशच्या इंदूरमधून अटक करण्यात आली. एप्रिल २०१८ साली जोधपूर विशेष न्यायालयात आसाराम या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर न्यायालयानं आसारामला पोक्सो कायद्यांतर्गत आणि १ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dkfw7l
No comments:
Post a Comment