Breaking

Sunday, February 14, 2021

करोना पुन्हा उचल खाऊ शकतो; 'हे' आहे प्रमुख कारण https://ift.tt/3jPqfaU

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : करोनाच्या संसर्गामुळे वेगवेगळ्या पातळ्यांवर समाजातील वेगवेगळ्या घटकांना विविध पातळीवरची किंमत मोजावी लागली आहे. महत्प्रयासाने साथ नियंत्रणात आली असली तरीही अद्याप ती पूर्ण संपलेली नाही. सुरू करण्यात आल्या असल्या तरी मास्क न लावता प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे साथीचा जोर पुन्हा एकदा उचल घेऊ शकतो, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. वाचा: 'आपण अजूनही शहाणे होणार नाही का', असा प्रश्न कोविड काळात रुग्णसेवा देणाऱ्या डॉ. ए. ए. माणिक यांनी उपस्थित केला. 'मागील वर्षभर मुंबई या संसर्गाच्या भीतीच्या छायेत होती. प्रवासादरम्यान अनेकजण मास्कचा वापर करत नाही. त्या प्रत्येकाला शिक्षा करणे हा उपाय नाही. त्यासाठी लोकशिक्षण आणि समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे', असे आग्रही मत त्यांनी मांडले. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अविनाश सुपे म्हणाले, 'रुग्णसंख्या पुन्हा तीनशेहून पाचशेपर्यंत जाताना दिसत आहे. लोकल सुरू झाल्यानंतर ही वाढ अपेक्षित होती. पण त्याचवेळी प्रवाशांनी प्रवास करताना नियमांचे पालन करणेही अपेक्षित होते. यामुळे संसर्ग पुन्हा वाढू शकतो.' वाचा: 'अनेकजण लस आल्यामुळे आता काळजी घेण्याचे काय कारण असा प्रश्न विचारतात. पण हा युक्तिवाद चुकीचा आहे. आपल्या लोकसंख्येमध्ये किती जणांनी लस घेतली आहे याची माहिती सर्वसामान्यांना आहे का? अशा वैद्यकीय संकल्पनांची सखोल माहिती सर्वसामान्यांना नसते. मात्र त्या अर्धवट माहितीच्या आधारे युक्तिवाद केले जातात', असे डॉ. राख यांनी सांगितले. ज्येष्ठांची काळजी आवश्यक सर्वसामान्यांसाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरणाची सुरुवात होणार आहे. त्यात पन्नास वर्षांवरील तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जुने आजार असलेल्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. नोकरी, शिक्षण तसेच इतर कारणांसाठी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या गटामध्ये लसीकरणाची संधी येईपर्यंत अजून दोन महिन्यांचा काळ लागू शकतो. प्रवासादरम्यान संसर्ग होऊन त्याची लागण घरातील ज्येष्ठ सदस्यांना होऊ नये यासाठीही योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ajkQpj

No comments:

Post a Comment