Breaking

Monday, February 22, 2021

ऑनलाइन पिझ्झा तब्बल ६१ हजारांना पडला; पाहा नेमके काय घडले? https://ift.tt/3pKqEg8

म. टा. वृत्तसेवा, पनवेलमधील एका महिलेला ऑनलाइन पिझ्झा मागवणे भलतेच महागात पडले आहे. एका अज्ञात टोळीने या महिलेला करण्याच्या बहाण्याने तिच्या मोबाइल फोनवर लिंक पाठवून त्या लिंकच्या माध्यमातून पेमेंट करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातून ६१ हजार २९८ हजाराची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी या अज्ञात टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. वाचा: या प्रकरणात फसवणूक झालेली ३४ वर्षीय महिला पनवेलमध्ये कुटुंबासह राहात असून २० फेब्रुवारी रोजी रात्री त्यांच्या मुलीने त्यांना पिझ्झा ऑर्डर करण्यास सांगितले होते. त्यानुसार या महिलेने गुगलवरून मिळालेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधल्यानंतर फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने पिझ्झाची ऑर्डर घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने पेमेंट ऑनलाइन करणार का, असे विचारुन त्यांना दोन लिंक पाठविल्या. या दोन्ही लिंकवर या महिलेने क्लिक करून पेमेंट केले. वाचा: मात्र त्यानंतर या महिलेच्या क्रेडिट कार्डवरून ९९९९, २४,९९९, २५००० आणि १३०० अशी रक्कम भलत्याच खात्यावर वळती झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधल्यानंतर त्यांची रक्कम एरॉन-गुरगाव, ड्रीम इलेव्हन, पेटीएम अशा तीन खात्यांत गेल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3umYprq

No comments:

Post a Comment