नवी दिल्ली : देशभरात करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात करोना योद्ध्यांचं लसीकरण सुरू आहे. यानंतर लवकरच दुसऱ्या टप्प्यात ५० वर्ष आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना करोना लस दिली जाणार आहे. देशात ५० वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांची संख्या २७ कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जातंय. या वृद्धांना दुसऱ्या टप्प्यात करोना लस दिली जाईल. यातील ६० वर्षाहून अधिक वयाच्या व्यक्तींना लसीकरणासाठी प्राथमिकता दिली जाणार आहे. सगळ्यांनाच लस मोफत मिळणार नाही दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना दोन समूहात विभागलं जाणार आहे. यातील एका समूहाला करोना लस मोफत दिली जाणार आहे तर दुसऱ्या गटाला लसीकरणासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना नोंदणी करताना हे पाहणं गरजेचं असेल की त्यांना करोना लस मोफत मिळणार आहे की पैसे मोजावे लागणार आहेत. कोणत्या गटाला दिली जाणार हे सरकारकडून निश्चित केलं जाणार आहे. दुसऱ्या राज्यातही मिळणार लस सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यात कुणाला लस मोफत मिळणार आणि कुणाला नाही? याबद्दल विस्तृत माहिती लवकरच जारी केली जाईल. या टप्प्यात लोकांना आपल्या गृहराज्यासोबतच इतर राज्यातही लस घेण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. १६ जानेवारी रोजी देशभरात करोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. ही जगातील सर्वात मोठी ठरतेय. यानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन कर्मचाऱ्यांना करोना लस देण्यात आलीय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aG7vI2
No comments:
Post a Comment