म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांनी आपल्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून माझी आणि दलाची हेतुपूर्वक बदनामी केली,' असे निदर्शनास आणून यांनी मुंबई सत्र न्यायालयात गोस्वामी यांच्याविरोधात फौजदारी तक्रारीच्या माध्यमातून मानहानीचा दावा केला आहे. 'रिपब्लिक टीव्ही व रिपब्लिक भारत या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून ही बदनामी करण्यात आली,' असे सांगून या वाहिन्यांची मालक कंपनी एआरजी आउटलायर मीडिया प्रायव्हेट कंपनी; तसेच कंपनीचे संचालक असलेले गोस्वामी व त्यांच्या पत्नी सम्यव्रता गोस्वामी यांच्याविरोधात त्रिमुखे यांनी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यात तिन्ही आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९, ५०० व ५०१ (बदनामी (करणे) कलम ३४ (कट रचणे) अशा आरोपांखाली कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत; तसेच इतक्या वर्षांच्या सेवेने कमावलेल्या माझ्या प्रतिष्ठेला आरोपींनी धक्का लावल्याने मला नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. नियमाप्रमाणे सरकारची पूर्वसंमती घेतल्यानंतर मुख्य सरकारी वकील जयसिंग देसाई यांच्यामार्फत त्रिमुखे यांनी ही तक्रार दाखल केली. 'मुंबई पोलिस हे सुशांतच्या मारेकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिषेक त्रिमुखे हे अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या संपर्कात सातत्याने होते. ते तिला या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बरेच निराधार आरोप करत थेट वाहिन्यांवरील बातम्यांमध्ये आणि चर्चासत्रात माझी बदनामी करण्यात आली. ऑगस्ट-२०२०मधील या बातम्या व चर्चासत्रांमध्ये माझा फोटो प्रसिद्ध करून बेछूट आरोप करत गोस्वामी यांनी अत्यंत दुष्ट हेतूने माझी व मुंबई पोलिस दलाची नाहक बदनामी केली,' असे त्रिमुखे यांनी तक्रारीत निदर्शनास आणले. 'कोणी जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी हल्ला चढवत असेल, तर ते सहन न करण्याचा सरकारी कर्मचाऱ्याला अधिकार आहे. गोस्वामी यांनी राज्यघटनेने माध्यमांना दिलेल्या भाषा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपल्या स्वार्थासाठी गैरवापर चालवला आहे. त्यामुळे न्यायालयाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे,' असे म्हणणेही त्यांनी तक्रारीत मांडले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cF8xW0
No comments:
Post a Comment