Breaking

Friday, February 19, 2021

कोवीन ॲप ठरतंय लसीकरणातील अडथळा; बीएमसीचे केंद्राला पत्र https://ift.tt/3uhm6RN

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई कोवीन ॲप व्यवस्थित सुरू नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. यासंदर्भात पालिका प्रशासनाने केंद्र सरकारला पत्र लिहले आहे. सर्वसामान्यांसाठी जेव्हा लसीकरण सुरू होईल, तेव्हा कोवीन ॲप सुरळीत सुरू झाले नाही तर लसीकरण प्रक्रियेला फटका बसू शकेल, याकडे लक्ष वेधले आहे. कोवीन ॲप सुरळीत काम करत नसल्यामुळे किमान २५ टक्के लसीकरण कमी झाले आहे. अन्य़था आता असलेले १ लाख ५५ हजार लाभार्थ्यांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले असते, असे पालिकेतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 'मटा'ला सांगितले. मुंबईला वेगळे ॲप तयार करू, अशी मागणी पालिकेने केंद्राकडे केली होती. मात्र त्यास मान्यता मिळाली नाही. वाचा: शुक्रवारी पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये कोवीन ॲप नीट काम करत नसल्यामुळे नाराजी होती. काही जणांना मेसेज आला तर काही जणांना मेसेज वा फोन आला नाही, त्यामुळे दुसरा डोस केव्हा घ्यायचा याविषयी संभ्रम होता. कागदपत्र असूनही कोवीन ॲपमध्ये नोंद झाली नाही, अशीही तक्रार समोर आली. लसीकरणाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळ आणि दिलेल्या दिनक्रमाचे पालन करणे अधिक गरजेचे असते. ते झाले नाही तर उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये अडचणी येतात. पूर्वी वॉर रुमच्या माध्यमातून फोन करून माहिती दिली जात होती. आता मात्र प्रत्येकाला फोन करून बोलावणे हेदेखील कर्मचाऱ्यांसाठी ताणाचे ठरत आहे. वाचा: एकीकडे संसर्ग पुन्हा नियंत्रित करण्याचे आवाहन व दुसरीकडे लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नांची शिकस्त करत आहे. लसीकरण सुरू असले तरीही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येकाने मास्क लावायला हवा, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दोघांना करोना दोन जणांमध्ये लस घेतल्यानंतर करोना संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात पालिका रुग्णालयाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, अँटिबॉडी तयार होण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे या कालावधीमध्ये जर संबधित व्यक्ती संसर्गित व्यक्तींच्या संपर्कात आली तर संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे लक्ष वेधले. ७,९२० जणांना लस शुक्रवारी मुंबईमध्ये ७,९२० जणांना लस देण्यात आली. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७८९ होती. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण ८६ टक्के तर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ५६ टक्के इतके होते आतापर्यंत राज्यात १ लाख ५५ हजार ३५८ जणांनी लस घेतली आहे. त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या एक लाख ६३, तर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची ५५ हजार ३०६ इतकी आहे. केईएम रुग्णालयामध्ये ८११ तर नायर रुग्णालयामध्ये ९०९ जणांनी पहिला डोस घेतला. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3duBQez

No comments:

Post a Comment