Breaking

Tuesday, February 2, 2021

LIVE : जिंदच्या शेतकरी महापंचायतीत सहभागी होणार राकेश टिकैत https://ift.tt/3jamZGX

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ७० दिवस पूर्ण झाले आहेत. आज या आंदोलनाचा ७१ वा दिवस आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर दुसरीकडे सरकारही मागे घेतले जाणार नाहीत, या आपल्या निर्णयावर अडून आहे. (अपडेट बातमी मिळवण्यासाठी वेबपेज रिफ्रेश करा) LIVE अपडेट : - गाझीपूर सीमेवर पुन्हा एकदा मोठ्या संख्येत शेतकरी एकवटलेले पाहून पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या भागात पोलिसांनी कलम १४४ लागू केलंय. - सरकारकडून सात जिल्ह्यांतील मोबाईल, इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५.०० वाजपेर्यंत ही वेळ वाढवण्यात आलीय. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हरयाणात कॅथल, पानीपत, जिंद, रोहतक, चरखी दादरी, सोनीपत आणि झज्जर या भागांत मोबाईल इंटरनेट (टूजी, थ्री जी, फोर जी, सीडीएमए, जीपीआरए) तसंच मोबाईल नेटवर्कवर उपलब्ध असलेली डोंगल सेवा आज सायंकाली ५.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. - भारत किसान युनियनचे नेते आज हरयाणातील जिंद जिल्ह्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या महापंचायतीत सहभागी होणार आहेत. जिंदच्या कंडेला गावात या महापंचायतीची तयारी करण्यात आलीय. 'ऑक्टोबरपर्यंत आंदोलनाची तयारी' - गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या राकेश टिकैत यांनी सरकारची चिंता वाढवलीय. 'आंदोलन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. त्यानंतर पुढची तारीख दिली जाईल' असं राकेश टिकैत यांनी मंगळवारी म्हटलं. - मंगळवारी, पोलिसांनी रस्त्यावर घातलेल्या बॅरिकेडसच्या बाजुला रस्त्यावर बसून राकेश टिकैत यांनी जेवण घेतलं. - मंगळवारी सायंकाळी संयुक्त किसान मोर्चाच्या एका प्रतिनिधिमंडळानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cEfLto

No comments:

Post a Comment