Breaking

Tuesday, March 30, 2021

उष्म्यामुळे वाढला आजारांचा दाह; मुलांमध्ये तापाचे प्रमाण अधिक https://ift.tt/3cAuRQc

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई हवेतील वाढलेली आर्द्रता आणि उष्म्यामुळे आरोग्याच्या विविध प्रकारच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. त्यात येण्यापासून डोळे लाल होणे, ओठामध्ये फोड येणे, अंगावर पुरळ उठणे, पाठीवर चट्टे येणे, पोटात मुरडा पडणे, अतिसाराचा त्रास होण्याच्या तक्रारी घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांकडे येणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. यात मुलांना ताप येण्याचे प्रमाणही वाढले आहे. ताप आल्यानंतर तो करोनामुळे ताप आहे का, या भीतीने डॉक्टरांकडे सातत्याने रुग्णांच्या नातेवाईकांची विचारणाही वाढली आहे. डॉ. जयेश लेले यांनी ओपीडीमध्ये अनेक रुग्णांना करोना संसर्गाच्या तापासारखी लक्षणे दिसून येतात. तपासणी केल्यानंतर हा ताप करोनाचा असल्याचे निदान होत नाही, तर इतर प्रकारच्या तापासारखा हा ताप असतो. मात्र या कालावधीमध्ये रुग्णांना करोनाचा ताप आहे का, ही धास्ती सतावत राहते, याकडेही लक्ष वेधले. फिजिशिअन डॉ. एस. एस. अतुल यांनी करोना संसर्गाच्या तापाप्रमाणे वाढत्या उष्म्यामुळे उष्णतेशी संबधित इतर आजारांनीही डोके वर काढले आहे. यात लहान मुलांना होणारा विविध प्रकारचा त्रास अधिक असल्याचे दिसून येते. लहान मुलांमध्ये व्हायरल संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसते. ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित असते, मात्र दोन ते तीन दिवस सतत ताप अंगात राहतो. त्यामुळे योग्यवेळी वैद्यकीय उपचार सुरू करणे गरजेचे आहे, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले. काही रुग्णांमध्ये करोनाच्या चाचण्या निगेटिव्ह येतात, टायफॉईडचे निदान होते. मात्र पुढील काही दिवसांनी पुन्हा ताप यायला सुरूवात होते. त्यावेळी करोना संसर्गासाठी चाचण्या केल्या तर त्या पॉझिटिव्ह असलेल्या दिसतात. त्यामुळे तापांच्या लक्षणांकडे अधिक काळजीपूर्वक पाहायला हवे. जे डॉक्टर वैद्यकीय उपचार देत आहेत त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवायला हवा. कोणत्याही प्रकारे शारीरिक लक्षणांमध्ये बदल जाणवला तर त्याची माहिती डॉक्टरांना द्यायला हवी, असे सांगण्यात येत आहे. 'संसर्गाच्या शक्यता लक्षात घ्या' असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलन्टचे प्रमुख डॉ. दीपक बैद यांनी एक वेगळे निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले की इतर आजारांची तीव्रता अधिक असलेल्या रुग्णांमध्ये करण्यात आलेल्या चाचण्या पॉझिटिव्ह असल्याचेही दिसत आहे. त्यांच्या परिचयातील एक रुग्ण चक्कर येऊन पडला. दुसऱ्या रुग्णाला पक्षाघाताची तक्रार होती. या दोन्ही रुग्णांमध्ये करोना चाचण्या पॉझिटिव्ह दिसून आल्या. त्यामुळे संसर्गाच्या नेमक्या शक्यताही लक्षात घ्यायला हव्यात. अनेक रुग्ण उष्णतेच्या तक्रारी घेऊन येतात तेव्हा पोटात उष्णतेमुळे त्रास होत आहे की ही लक्षणे करोनाची आहेत, याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dlCyZN

No comments:

Post a Comment