Breaking

Sunday, March 28, 2021

इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेल दर https://ift.tt/3fjE4hH

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग चौथ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. आज सोमवारी मुंबईत ९७.१९ रुपयांवर कायम आहे. डिझेलचा भाव ८८.२० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.७८ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.१० रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.७७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.१० रुपये भाव आहे. आज सोमवारी कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.९८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.९८ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.८२ रुपये असून डिझेल ८५.७४ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.३७ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.८१ रुपये आहे. गेल्या आठवड्यात कंपन्यांनी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेल दरात कपात झाली होती. कंपन्यांनी बुधवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये १८ पैसे आणि डिझेलमध्ये १७ पैशांची कपात केली होती. तर गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २० पैशांनी स्वस्त केले होते. दोन दिवस झालेल्या दर कपातीनंतर पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैसे स्वस्त झाले होते. तर त्यानंतर सलग चार दिवस इंधन दर स्थिर ठेवले आहेत. दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली आहे. कच्च्या तेलाचा भाव र टक्क्यांनी वधारला आहे. आज सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ०.१९ डॉलरने वधारला आणि ६४.७६ डॉलर प्रती बॅरल झाला. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.०७ डॉलरने वधारला असून तो ६१.०४ डॉलर झाला आहे.सुएझ कालव्यातील कोंडी फोडण्यात अखेर सहा दिवसांनी यश आले आहे. त्यामुळे जागतिक कमॉडिटी बाजारात पुन्हा एकदा तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात कंपन्यानी १६ वेळा इंधन दरवाढ केली होती. यात पेट्रोल ४.७४ रुपयांनी महागले होते तर डिझेलमध्ये ४.५२ रुपयांची वाढ झाली होती. काही शहरांमध्ये पेट्रोलचा भाव १०० रुपयांवर गेला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cy7wii

No comments:

Post a Comment