Breaking

Monday, March 1, 2021

ठाण्यातील 'ही' बँक ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीची फिल्डिंग https://ift.tt/3kFfIiX

म. टा. प्रतिनिधी, ठाणे ठाणे-पालघर जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचे संचालक निवडून या माध्यमातून जिल्ह्यातील रोजगाराला चालना देण्याचा मनोदय राज्याचे नगरविकासमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री यांनी बोलून दाखवला आहे. यापूर्वी शिवसेनेकडून कधीही गांभीर्याने लढवली गेली नसलेल्या या निवडणुकीत तीनही पक्षांनी समन्वय साधून बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार रविवारी ठाण्यात केला. वाचा: येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेली ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक एकत्रित लढविणार असल्याची माहिती जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी आढावा बैठकीदरम्यान ठाण्यात दिली. ३० मार्च रोजी ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ठाणे पालघर प्रभारी राजेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या निवडणुकीची जबाबदारी आर. सी. पाटील आणि गोपाळ लांडगे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, याआधी ही निवडणूक कधीही गांभीर्याने घेतली नव्हती. मात्र, आता महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढविणार आहे. उमेदवार निवडीपासून महाविकास आघाडी एकत्रित काम करणार असून ही निवडणूक आम्हाला अवघड नाही. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, टीडीसीची निवडणूक लढवून आपल्या विचारांची एक संस्था ताब्यात घेऊन त्याद्वारे रोजगार निर्मिती करण्याचा आपला उद्देश आहे. त्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. कार्यकर्त्यांनी एकत्र यायचे ठरविले तर त्यासाठी मेहनत करायला तिन्ही पक्षांचे नेते सज्ज आहोत. सध्या ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे ही निवडणूक खूप सोपी आहे. यावेळी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, आमदार उपस्थित होते. सहकाराला सरकारची मदत ठाणे मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही सहकाराची निवडणूक आहे. सहकार अडचणीत आल्यावर सरकारने मदत करायची असते. गेले अनेक वर्षे आम्ही हेच करीत आलो आहोत. म्हणून सहकार क्षेत्र जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र निवडणूक लढविणार आहोत. त्यामध्ये कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. जागा वाटपाबद्दल बोलताना ही पहिलीच आढावा बैठक आहे. लवकरच जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले. २१ जागांसाठी ३० मार्चला मतदान ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी येत्या ३० मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी २६ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान अर्जवाटप आणि अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ५ मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून २१ मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तर, ३० मार्च रोजी मतदान आणि ३१ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये कृषी-पतसंस्थांमधून १४, पगारदार पतसंस्थांमधून १, खरेदी-विक्री संघातून १, महिला राखीव २, अनु.जाती-जमातींसाठी १ आणि ओबीसींसाठी १ जागा राखीव आहे. ३ हजार ६८ मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2NSgHQX

No comments:

Post a Comment