म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई गेल्या काही दिवसांपासून दररोज दहा हजारांहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्णालयांतील वेगाने भरू लागल्या आहेत. सरकारी, खासगी रूग्णालये आणि करोना काळजी केंद्रात मिळून केवळ ६३ आयसीयू, १८२६ ऑक्सिजन खाटा आणि २६ खाटा रिक्त आहेत. येत्या काही दिवसांत रुग्णवाढ कायम राहिल्यास आयसीयू आणि व्हेंटि-खाटांची कमतरता भासू शकतो. त्यामुळे पालिकेने तातडीने १०० हून अधिक व्हेंटिलेटर आणि तीन टँक ऑक्सिजन खरेदीसाठी निविदा मागवल्या आहेत. मार्च अखेरपर्यंत दररोज चार ते पाच हजार असलेली रूग्णसंख्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून झपाट्याने वाढू लागली आहे. दररोज १० ते ११ हजारांहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या विविध रुग्णालयांत ८६ हजारांहून अधिक रुग्ण आहेत. या रुग्णांपैकी एक हजार १७१ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर १३ हजार ४७५ रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे असून ७१ हजारांहून अधिक रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. यातील बहुसंख्य रुग्ण घरी विलगीकरणात असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. पालिकेने मागील पंधरा दिवसांपासून चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. सध्या दररोज ५० हजारांपर्यंत चाचण्या केल्या जात असून ही संख्या येत्या काही दिवसात ६० हजारांपर्यंत नेण्यात येणार आहे. खाटांची कमतरता पडू नये यासाठी मुंबईतील सर्व 'आयसीयू' खाटा पालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. शिवाय खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले आहेत. खाटांची संख्या वाढवण्यासाठी जम्बो कोविड सेंटरसह, कोविड केअर सेंटरमधील सर्व खाटा कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईत खाटांची कमतरता भासणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. खाटांचा लेखाजोखा करोना समर्पित रूग्णालये व आरोग्य केंद्रातील (डीसीएच, डीसीएचसी, सीसीसी-२) खाटा एकूण खाटा २४,०३९ रूग्णांनी व्याप्त १९,१९८ रिक्त खाटा ४,८४११ डीसीएच, डीसीएचसी खाटा एकूण खाटा १८,२१३ रूग्णांनी व्याप्त १६,६४८ रिक्त खाटा ३,५६५ आयसीयू खाटा एकूण खाटा २,२४८ रूग्णांनी व्याप्त २,१८५ रिक्त खाटा ६३ ऑक्सिजन खाटा एकूण खाटा ११,२०९ रूग्णांनी व्याप्त ९,३८३ रिक्त खाटा १,८२६ व्हेंटिलेटर खाटा एकूण खाटा १,२०५ रूग्णांनी व्याप्त १,१७९ रिक्त खाटा २६
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uHn5KI
No comments:
Post a Comment