Breaking

Sunday, April 11, 2021

करोनाची दुसरी लाट; सेन्सेक्स- निफ्टीमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदार होरपळले https://ift.tt/2OEMlSm

मुंबई : देशात करोनाची दुसरी लाट आली असून दैनंदिन रुग्णसंख्येने दीड लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे नजीकच्या काळात होणार या भीतीने आज गुंतवणूकदारांची गाळण उडाली. भांडवली बाजार उघडताच झालेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा असून निफ्टीत ३५९ अंकांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारात देखील आज मोठी पडझड दिसून आहे. आज गुंतवणूकदारांनी बँका, वित्त संस्था, ऑटो या क्षेत्रात विक्रीचा मारा सुरु ठेवला आहे. राज्यात कोणत्याही क्षणी कठोर लाॅकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे तर केंद्र सरकारकडून देखील कठोर निर्बंध लागू केले जातील या भीतीने गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा लावला असल्याचे शेअर दलालांनी सांगितले. मात्र आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे किमान तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे. करोना रुग्णसंख्या दररोज एक नवा रेकॉर्ड कायम करताना दिसतेय. अशावेळी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी संयम बाळगणं आवश्यक झालंय. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ११ एप्रिल २०२१ रोजीच्या २४ तासांत देशात जवळपास १.६९ करोना रुग्ण आढलले आहेत. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. हाच वेग कायम राहिला तर देशात दररोजची संख्या अगदी काही दिवसांत दोन लाखांवर पोहचू शकते. राज्यात २४ तासांत तब्बल ९०४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3a2xDMx

No comments:

Post a Comment