Breaking

Thursday, April 22, 2021

'दोन कानाखाली खाशील', ऑक्सिजनची तक्रार करणाऱ्याला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर https://ift.tt/2RWffyK

दमोह, भोपाळ : मध्य प्रदेशातील भागात उभारण्यात आलेल्या एका कोव्हिड केअर सेंटरचं निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय राज्य मंत्री इथं पोहचले होते. यावेळी, केंद्रीय मंत्र्यांकडे आपल्या करोना संक्रमित आईसाठी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या तरुणाला 'असं बोललास तर दोन कानाखाली खाशील' म्हणत आपल्या हरवलेल्या संवेदनशीलतेचा पुरावाच दिला. ऑक्सिजन मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली अशा अनेक राज्यांत करोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढल्यानं आरोग्य व्यवस्था अत्यंत गंभीर परिस्थितीतून जातेय. यामुळे अनेक रुग्णांना आपले जीवही गमवावे लागलेत. रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्लान्टबाहेर २४-४८ तासांपर्यंत रांगेत उभे असलेले दिसत आहेत. परंतु, या दरम्यान मंत्र्यांची असंवेदनशील वक्तव्यही समोर येत आहेत. केंद्रीय मंत्र्यांना विचारला जाब मीडियाचे कॅमेरे समोर असताना एका तरुणानं केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी करोना संक्रमित रुग्णाच्या एका नातेवाईकानं ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल तक्रार करत केंद्रीय मंत्र्यांना जाब विचारला. पण, ही गोष्ट मंत्री महोदयांना रुचली नाही. त्यामुळे त्यांनी तरुणाला 'दोन झापडी ठेवून देण्याची' धमकी दिली. यावर, 'झापडीही खाईन पण ऑक्सिजनची व्यवस्था तर करा', असं म्हणत आपली हतबलताच व्यक्त केली. मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल 'हे सगळे आम्हाला मूर्ख बनवत आहेत. ३६ तास उलटलेत तरी आम्ही अस्वस्थ आहोत. ऑक्सिजन सिलिंडर देणार असल्याचं सांगितलं जातंय परंतु ऑक्सिजन काही मिळालेला नाही. ऑक्सिजन नाहीच असं यांनी स्पष्टपणे सांगून टाकावं', असं उद्विग्न झालेल्या तरुणानं म्हटल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसून येतंय. 'तुम्हाला ऑक्सिजन सिलिंडर देण्यासाठी कुणी नकार दिलाय का?' असा प्रश्न पटेल यांनी तरुणाला केल्यावर 'हो नकार मिळालाय. केवळ पाच मिनिटांसाठी ऑक्सिजन देण्यात आला. जर ऑक्सिजनची व्यवस्था होत नसेल तर रुग्णालयानं रुग्णांना दाखल करून घेण्यास मनाई करावी' असंही या तरुणानं म्हटलं. मंत्र्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण या घटनेवर पटेल यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरणही जाहीर करण्यात आलंय. तरुण डॉक्टर आणि नर्सेस विरुद्ध अभद्र भाषेचा वापर करत असल्यानं केंद्रीय मंत्र्यांनी या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला असं यात म्हटलं गेलंय. 'बेपत्ता' मंत्री मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून दमोहचे खासदार प्रल्हाद पटेल यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. यात पटेल बेपत्ता असल्याचा दावा करण्यात आला होता. करोना संक्रमणाचा प्रभाव वाढत असताना पटेल मात्र इथे फिरकलेही नव्हते. मात्र सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच पटेल दमोहच्या कोव्हिड सेंटरमध्ये दिसले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vdZkKk

No comments:

Post a Comment