Breaking

Tuesday, April 20, 2021

लस घेण्यासाठी जाताय? 'या' रंगाचे स्टिकर लावा https://ift.tt/3ascSd8

म. टा. खास प्रतिनिधी, राज्य सरकारने लावलेले निर्बंध पाळले जावेत, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी व्हावी, यासाठी मुंबई पोलिसांनी बंधनकारक केलेल्या रंगांच्या कोडबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रम कायम आहे. ट्विटर, नियंत्रण कक्ष, पोलिस ठाणी तसेच नाकाबंदीच्या ठिकाणी याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यात प्रामुख्याने 'लस घेण्यासाठी खासगी वाहनातून जायचे आहे, कोणता रंग वापरायचा?' या प्रश्नाचा समावेश असून लस असो व डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम असल्यास लाल रंगाचा स्टिकर वापरावा, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोणी, कोणता रंग वापरावा? लाल रंग डॉक्टर, वैद्यकीय सेवा, कर्मचारी, रुग्णवाहिका, रुग्णालय, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधविक्रेते, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, उत्पादन आणि वितरण युनिट्स त्यांच्या विक्रेत्यांसह वाहतूक आणि पुरवठा साखळी, लस, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय साहित्य, त्यांचे उपकरणे यांचे उत्पादक व वितरक, कच्चा माल युनिट, पशुवैद्यकीय सेवा/ पशु काळजी निवारा हिरवा रंग खाण्यायोग्य अन्नपदार्थ जसे किराणा सामान, भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी पदार्थ, मिठाई आणि कच्च्या किंवा शिजवलेल्या स्वरूपात सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ यांच्या वाहतुकीसाठी पिवळा रंग केंद्र, राज्य व स्थानिक सरकारे यांचे अधिकारी आणि कर्मचारी, त्याच्या वैधानिक अधिकारी व संस्थांसह, स्थानिक सर्व सार्वजनिक अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वाहतूक, मीडिया, पाणीपुरवठा सेवा, इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा सेवा, नगरपालिका सेवा, दूरसंचार सेवांचे देखभाल सेवा, इ- कॉमर्स (फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवठासाठी), सरकारी आणि खासगी सुरक्षा सेवा, एटीएम/ बँकिंग/ वित्तीय/ विमा सेवा, मालवाहू सेवा, डाक सेवा, पेट्रोल पंप, अत्यावश्यक सेवा पुरविणारी कंपन्यांची कार्यालये, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे अत्यावश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेली कोणतीही सेवा घरी बनवा स्टिकर्स पोलिस ठाणी तसेच नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने तीन रंगाच्या स्टिकर्स मोफत दिले जातात. परंतु पोलिसांकडील स्टिकर्सच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने आम्ही स्टिकर्स कुठून घ्यायचे, अशीही विचारणा होत आहे. आपण ज्या सेवेत आहोत त्या सेवेसाठी ठरविण्यात आलेल्या रंगाचा कागद घेऊन सहा इंच व्यासाचे वर्तुळ कापून ते वाहनावर घरच्या घरी चिकटवावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2P7A2ON

No comments:

Post a Comment