Breaking

Tuesday, April 20, 2021

कर्नाटकातही ४ मेपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा, विकेन्ड कर्फ्यूही लागू https://ift.tt/3dBBlyY

बंगळुरू : देशात करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना अनेक ठिकाणी राज्य सरकारकडून वेगवेगळे , विकेन्ड लॉकडाऊन यांसारखे निर्बंध घालण्यात आले आहेत. याच दरम्यान कर्नाटकातही नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आलीय. ( in Karnataka) मंगळवारी जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, राज्यात २१ एप्रिल ते ४ मे पर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहील. राज्यात रात्री ९.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू सुरू राहील. तसंच प्रत्येक विकेन्डला (शनिवार - रविवार) संपूर्ण दिवस कर्फ्यू सुरू राहील. या दरम्यान नागरिकांना अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी असेल. रात्री ९ वाजल्यानंतर सर्व मॉल आणि दुकानं बंद राहतील. याशिवाय शिक्षण संस्था, जिम आणि स्पा देखील बंद राहतील. स्विमिंग पूल केवळ ट्रेनिंगसाठी खेळाडूंसाठी उघडले जातील. कुंभहून परतणाऱ्यांसाठी... राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या आदेशानुसार, हरिद्वार कुंभातून परतणाऱ्या भाविकाला सर्वात अगोदर आपली आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल. करोना संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारनं हे आदेश दिले होते. करोना संक्रमित मुख्यमंत्री खासगी रुग्णालयात राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या बंगळुरूमध्ये आढळतेय. राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हेदेखील गेल्या शुक्रवारी करोना संक्रमित असल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी ते एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या आठ महिन्यांत मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा कोव्हिड १९ संक्रमित आढळले आहेत. ७८ वर्षीय येडियुरप्पा यापूर्वी २ ऑगस्ट २०२० रोजी करोना संक्रमित आढळले होते. कर्नाटकातील आकडेवारी कर्नाटकात मंगळवारी एकाच दिवशी सर्वाधिक २१,७९४ रुग्ण समोर आल्यानंतर एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ११ लाख ९८ हजार ६४४ वर पोहचलीय. याशिवाय १४९ रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण संख्या १३,६४६ वर पोहचलीय. सध्या राज्यात एकूण १ लाख ५९ हजार १५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dyuAOj

No comments:

Post a Comment