Breaking

Wednesday, April 21, 2021

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव https://ift.tt/3dF6txl

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. सलग सातव्या दिवशी देशातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि स्थिर आहे. आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते. अमेरिका आणि युरोपात पुन्हा एकदा करोनाचा कहर वाढत आहे. भारतात मागील आठवडाभरापासून करोना रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर लाॅकडाउनची शक्यता वाढली आहे. स्थानिक पातळीवर कर, व्हॅट आणि इतर शुल्कामुळे शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेल दर वेगवेगळे आहेत. दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मात्र घसरण सुरूच आहे. यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ६०.७७ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. तर ब्रेंट क्रूडचा भाव ६४.७५ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. देशात करोना संसर्गाने चिंता वाढवली आहे. करोनाचा प्रादुर्भाव आता अतिशय झपाट्याने वाढत असल्याचं आकडेवारीवरून समोर येत आहे. आता बुधवारी देशात करोनाचे ३ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसंच २१०० हून अधिक जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या ७ दिवसांत देशात १८ लाखांहून अधिक नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. याच्या आधीच्या आठवड्यात ही संख्या १० लाखांहून अधिक होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nlcKSl

No comments:

Post a Comment