मुंबई: अभिनेता त्याच्या चित्रपटांमुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतो. जॉन अब्राहम सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो पण सध्या त्याच्या नावाची चर्चा एका खास कारणामुळे होताना दिसत आहे. जॉन आणि त्याची पत्नी यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जॉन त्याची पत्नी प्रियासोबत नाश्ता करताना दिसत आहे. पण त्यांच्या प्लेटमध्ये फक्त ग्रीन सलाड आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. पण काही युझर्सना मात्र जॉन-प्रिया यांचा हा फोटो खास पसंत पडलेला नाही आणि त्यांनी या दोघांनाही ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युझरनं यावर कमेंट करताना लिहिलं, 'अरे हे तर बकरीचं खाणं आहे' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'तुम्ही हे कसं खाऊ शकता.' याशिवाय अन्य एका युझरनं सुद्धा जॉनच्या फोटोवर कमेंट करताना म्हटलं, 'हे तर अगदीच गवत आहे.' जॉनची पत्नी प्रिया रुंचल लाइमलाइट पासून नेहमीच दूर असते. तसेच हे दोघंही फार कमी वेळा एकमेकांसोबत दिसतात. बॉलिवूडचा हॅन्डसम आणि डॅशिंग अभिनेता अशी ओळख असलेल्या जॉनची प्रियाशी ओळख २०१०मध्ये झाली होती. २०१४ मध्ये या दोघांनी लग्न केलं आणि हे दोघं आपली मॅरीड लाइफ नेहमीच प्रसार माध्यमं आणि सोशल मीडिया यांच्यापासून दूर ठेवणंच पसंत करतात. प्रिया रुंचल एक इनवेस्टमेन्ट बँकर आहे आणि ती अमेरिकेत राहते. प्रियाचा जन्म आणि शिक्षणही अमेरिकेतच झालं आहे. लग्नानंतर जॉन आणि प्रिया बराच काळ लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहिले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mVlEFI
No comments:
Post a Comment