सिंधुदुर्ग : सातत्याने सलग दोन वर्षे सुरगीच उत्पन्न घेणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. गेल्यावर्षी करोनामुळे जग ठप्प होत तर यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पन्नात घट झाली आहे. सुरंगी पिकाच ३० ते ३५ कोटींचे उत्पन्न होते मात्र यंदा उत्पन्नात सुमारे ६० ते ७० टक्के घट झाली आहे. त्यामुळे केवळ ३० टक्के उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती लागणार आहे. त्यातच अपुरे कामगार, घसरणारा दर आणि करोनाचे संकट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, कणकवली, सावंतवाडी, खारेपाटण आदी तालुक्यातील गावात सुरंगी या पिकांच उत्पादन होते. या उत्पादनावर येथील शेतकरी याच अर्थकारण सुरंगीच्या उत्पादनावर होत आहे. सुरंगीची झाडे अतिशय उंच व विखुरलेली असतात. हे जंगलातील उत्पन्न आहे आंब्यासारखे दिसते. सुरंगीच्या सुकलेल्या कळ्या आणि फुले यांना मोठी मागणी आहे. स्थानिक पातळीवर फुलांना मागणी आहे. ही फुले काढून हार बनविले जातात. फुले सुगंधी असल्याने मोठी मागणी असते. तर कळ्यांना जास्त मागणी असल्याने शेतकरी कळ्या काढतात. त्या सुकविल्या जातात. याचा वापर सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, सुगंधी द्रव्ये, रंग आदींसाठी केला जातो. मात्र यंदा सुरंगीची आवकच मर्यादित राहिली आहे. सुरंगीच उत्पन्न करणाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे १२०० ते १५०० लाभार्थी कुटुंब आहेत. प्रत्येक कुटुंबाचे प्रतिहंगाम सरासरी उत्पन्न दोन ते चार लाखापर्यंत जाते. प्रतिहंगाम वार्षिक उलाढाल ३० ते ३५ कोटींपर्यंत होते. सुरंगीचे कळे गोळा करण्याचे काम खूप जोखमीचे आहे. तोडणीनंतरही ते नीट सुकवून ठेवावे लागतात. कमी कालावधीत जास्त काम करायचे असते. सुरंगी काढणे जोखमीचे खर्चिक काम आहे.कळे गोळा करण्याचे काम यासाठी हंगामात माणशी प्रतिदिन ९०० रुपये मजुरी आहे. मात्र स्थानिक बाजारपेठेवर मुठभर व्यापाऱ्यांची मक्तेदारी असल्याने मजुरांना ३०० ते ३५० रुपयांपर्यंत मजुरी दिली जाते. सुरंगीला संरक्षित प्रजातींमधील झाड म्हणून घोषीत करण्याची गरज जाणकारांनी व्यक्त केली आहे. पश्चिम घाटातील सर्वच भागात होत नाही. लागवड योग्य भाग आहे तेथे प्रत्येक कुटुंबाने आपल्या परसबागेत दोन झाडे लावली तरी हा वृक्ष संरक्षित होईल. त्या कुटुंबाला यातून उत्पन्नही मिळेल. सुरंगी परागीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. सातत्याने दोन वर्षे सुरंगीच उत्पन घेणारे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊन यावर्षी ५० ते ६० टक्के उत्पन्न घटले आहे. केवळ वेंगुर्ले तालुक्यातील या १० ते १२ गावाच्या सुरंगीची उलाढाल १२ ते १५ कोटींच्या घरात होते. त्यामुळे हे शेतकरी सुरंगीला हमी भाव , विमा संरक्षण तसेच सातत्याने दोन वर्ष नुकसानीमुळे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cJhQ6V
No comments:
Post a Comment