वॉशिंग्टन: इस्रायलनंतर आता अमेरिकाही मास्क मुक्तीकडे वाटचाल करत आहे. करोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत आता करोना लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना मास्क न घालण्याची मुभा देण्यात येणार आहे. मात्र, त्यांना गर्दीचे ठिकाणी करावा लागणार आहे. करोना लसीकरणानंतर अमेरिकेतील परिस्थिती सुधारत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेची आरोग्य संस्था असलेल्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राने (सीडीसी) म्हटले की, लसीकरण पूर्ण केलेल्या अमेरिकन व्यक्तींना गर्दीची मोठी ठिकाणे वगळता अन्यत्र मास्कचा वापर करण्याची आवश्यकता नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ट्विट करत म्हटले की , करोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी केलेल्या असाधारण कामगिरीमुळे सीडीसीने आज घोषणा केली आहे. वाचा: बायडन यांनी म्हटले की, पूर्णपणे लसीकरण झाले असल्यास गर्दीची सार्वजनिक ठिकाणे वगळता अन्य ठिकाणी मास्कचा वापर करण्याची आवश्यकता नाही. प्राण वाचवण्यासाठी लसीकरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. सीडीसीने याआधीदेखील लस घेतलेल्या व्यक्ती मास्क न घालता लस न घेतलेल्या व्यक्तींना भेटू शकतात, असे म्हटले होते. मात्र, ती लस न घेतलेली व्यक्ती कमी धोकादायक गटातील असली पाहिजे, असेही स्पष्ट करण्यात आले होते. वाचा: वाचा: दरम्यान, इस्रायलने एक वर्षानंतर घराबाहेर पडताना मास्क अनिवार्य करण्याचा नियम रद्द केला आहे. इस्रायलमध्ये जवळपास ८० टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. त्यानंतर आता इस्रायलने रविवारी मास्क वापराचा अनिवार्य वापर करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. इस्रायलमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते. त्याच्या परिणामी संसर्गबाधितांची संख्या कमी झाली. त्यामुळे काही नियमांमध्ये शिथिलता देणे शक्य झाले असल्याचे इस्रायलचे आरोग्यमंत्री युली इडेलस्टेन यांनी म्हटले होते. इस्रायलमध्ये कार्यालयात अनिवार्य केला आहे. ९३ लाख लोकसंख्या असलेल्या इस्रायलमध्ये आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांना करोनाची लस देण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2R9eoKM
No comments:
Post a Comment