नवी दिल्ली : करोना रुग्णसंख्या दररोज एक नवा रेकॉर्ड कायम करताना दिसतेय. अशावेळी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी संयम बाळगणं आवश्यक झालंय. प्रशासनाच्या सक्तीशिवायही करोना नियमांची अंमलबजावणी करणं हे नागरिकांचं कर्तव्य बनलंय. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ११ एप्रिल २०२१ रोजीच्या २४ तासांत देशात जवळपास १.६९ करोना रुग्ण आढलले आहेत. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. हाच वेग कायम राहिला तर देशात दररोजची संख्या अगदी काही दिवसांत दोन लाखांवर पोहचू शकते. राज्यात २४ तासांत तब्बल ९०४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ६९ हजार ९१४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ९०४ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ३५ लाख २५ हजार ३७९ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७० हजार २०९ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (६३ हजार २९४), उत्तर प्रदेश (१५ हजार २७६), दिल्ली (१० हजार ७७४), छत्तीसगड (१० हजार ५२१) , कर्नाटक (१० हजार २५५) या राज्यांत आढळले आहेत. एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ३५ लाख २५ हजार ३७९ एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी २१ लाख ५३ हजार ७१३ उपचार सुरू : ११ लाख ९५ हजार ९६० एकूण मृत्यू : १ लाख ६८ हजार ४६७ करोना लसीचे डोस दिले गेले : १० कोटी १५ लाख ९५ हजार १४७ गेल्या काही दिवसांत संक्रमित रुग्णांची संख्या १ एप्रिल : ८१ हजार ३९८ २ एप्रिल : ८९ हजार ०२३ ३ एप्रिल : ९२ हजार ९९४ ४ एप्रिल : १ लाख ०३ हजार ४९४ ५ एप्रिल : ९६ हजार ५६३ ६ एप्रिल : १ लाख १५ हजार ३१२ ७ एप्रिल : १ लाख २६ हजार ७८९ ८ एप्रिल : १ लाख ३१ हजार ८७८ ९ एप्रिल : १ लाख ४४ हजार ८२९ १० एप्रिल : १ लाख ५२ हजार ८७९ ११ एप्रिल : १ लाख ६९ हजार ९१४ गेल्या काही दिवसांतील मृतांची संख्या १ एप्रिल : ४६८ २ एप्रिल : ७१३ ३ एप्रिल : ५१४ ४ एप्रिल : ४७७ ५ एप्रिल : ४४६ ६ एप्रिल : ६३० ७ एप्रिल : ६८५ ८ एप्रिल : ८०२ ९ एप्रिल : ७७३ १० एप्रिल : ८३९ ११ एप्रिल : ९०४
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3d9qs70
No comments:
Post a Comment