Breaking

Wednesday, April 14, 2021

सूरतमध्ये करोनामुळे अवघ्या १४ दिवसांच्या बालकाचा मृत्यू https://ift.tt/3mOWJ6z

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद, सूरत, वडोदरा या शहरांना घातलेला दिसतोय. सूरतच्या न्यू सिव्हिल रुग्णालयात अवघ्या १४ दिवसांच्या चिमुरड्याचा करोना संक्रमणामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. अवयव निकामी झाल्यामुळे (मल्टीपल ऑर्गन फेल्युअर) झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. सूरतच्या आणखी एका खासगी रुग्णालयात आणखीन एका १४ दिवसांच्या मुलीला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलंय. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं समजतंय. अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, करोनामुळे होणाऱ्या मृत्युत १५ टक्के मृत्यू तरुण रुग्णांचे होत आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ७ हजार ४१० रुग्ण आढळले आहेत तर ७३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. देशभरात करोनाच्या रुग्णसंख्येत अत्यंत तेजीनं वाढ दिसून येत असताना हा विषाणू आता लहानग्यांच्या जीवावरही उठल्याचं दिसतंय. करोनाच्या दुसऱ्या लाटेत वयोवृद्ध रुग्णांसोबतच मुलांमध्येही तेजीनं संक्रमण फैलावताना दिसून येतंय. अशावेळी नवजात बालकांना गंभीर संक्रमणाला सामोरं जावं लागणं अत्यंत क्लेशकारक ठरतंय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावेळी करोनाचा बदललेला स्ट्रेन अगोदरपेक्षाही अधिक संक्रामक आहे. लहान मुलांची प्रतिकारक्षमता कमी असते त्यामुळे ते अत्यंत सहजपणे करोनाचा शिकार होऊ शकतात. दिल्ली, एनसीआर, हरयाणा, , गाझियाबाद या भागांतही अनेक करोना संक्रमित लहान मुलं आढळून आली आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3smbxLf

No comments:

Post a Comment