म. टा. प्रतिनिधी, मुंबई रेल्वे परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांना चाप लावण्यासाठी रेल्वे मंडळाने तिकीट तपासणीसांच्या (टीसी) अधिकारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता टीसी देखील विनामास्क प्रवाशांवर ५०० रुपये दंड आकारण्याची कारवाई करू शकणार आहेत. 'करोनाची स्थिती लक्षात घेता रेल्वे परिसरात थुंकणे आणि त्या प्रकाराचे वर्तन करून रेल्वे परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. आता यात विनामास्क वावरणे या गुन्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. रेल्वेगाड्यांसह रेल्वे परिसरात आढळल्यास संबंधिताला ५०० रुपयांचा दंड आकारावा', असा आदेश रेल्वे मंडळाच्या प्रवासी विपणन विभागाचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी दिला आहे. शनिवारी रेल्वे प्रशासनाने हे आदेश दिले असून याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, असेही नमूद करण्यात आले आहे. आगामी सहा महिने दंड आकारण्याची मुभा टीसींना असणार आहे. वाचा: राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ५ एप्रिल रोजी आदेश काढून विनामास्क रेल्वे प्रवाशांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करावा, अशा सूचना केल्या होत्या. रेल्वे स्थानकात विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने ३०० मार्शलची नियुक्ती केली आहे. मात्र मुख्य सचिवांच्या आदेशाचे पालन अद्याप झालेले नसल्याचे कारवाईतील आकड्यांवरून दिसून येते. विनामास्क प्रवाशांवरील कारवाई महिना... प्रकरणे... दंड वसूल (रु.) फेब्रुवारी... ४,०१७... ६,२९,६०० मार्च... ६,९७२... १०,९३,५०० १७ एप्रिलपर्यंत... १,६४०... ३,९९,८००
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3x23K8V
No comments:
Post a Comment