Breaking

Saturday, April 10, 2021

पश्चिम बंगाल : भाजप-तृणमूलमध्ये हिंसाचार, गोळीबारात चार जणांचा मृत्यू https://ift.tt/3t7qiCV

कोलकाता : साठी आज चौथ्या टप्प्यात मतदान पार पडतंय. या निवडणुकीत याआधीही अनेक हिंसाचार झालेला पाहायला मिळाला आहे. परंतु, आज झालेल्या हिंसाचारात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कूचबिहारमध्ये भागात भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांत झालेल्या झटापटीनंतर झाला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सुरक्षा दलाकडून () ही करण्यात आली होती. मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचलेल्या एका १८ वर्षीय मतदाराचाही कथित गोळीबारात मृत्यू झाल्याचं समजतंय. या तरुणाचं नाव आनंद बर्मन असल्याचं समजतंय. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एका गावात सीआयएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर ओपन फायरिंगमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. आनंद हा भाजप समर्थक होता त्यामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. कुटुंबानं तृणमूल काँग्रेसला या गोळीबारासाठी जबाबदार धरलं आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसनं या हत्येच्या मागे भाजपचा हात असल्याचं म्हटलंय. गोळीबारात मृत्युमुखी पडलेले चार जण तृणमूलचे कार्यकर्ते होते असा दावाही पक्षाकडून करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सितलकुची भागात निवडणुकी दरम्यान हिंसक झटापट झाल्यानंतर गोळीबार झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात आनंद बर्मन याचाही समावेश होता. याशिवाय आणखीन चार जण जखमी अवस्थेत आहेत. प्रत्यक्ष दर्शींच्या म्हणण्यानुसार, स्थानिक लोकांनी सीआयएसएफ जवानांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जवानांना गोळीबार करावा लागला. दोन्ही पक्षांदरम्यान (भाजप आणि तृणमूल) हिंसाचार उफाळल्यानंतर स्थानिकांनी सीआयएसएफ जवानांना घेरून त्यांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सेंट्रल फोर्सनं ओपन फायरिंग केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3d32RVA

No comments:

Post a Comment